17 kg ganja seized goods worth 13 lakhs bhandara Police action Sakal
विदर्भ

Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यात १७ किलो गांजा जप्त, वाहनासह १३ लाखांचा माल; पोलिसांची धडक कारवाई

Bhandara Latest News : भंडारा जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन करणारे व बाळगणारे यांच्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यापैकी अंमली पदार्थ (गांजा) बाळगणारे व वाहतुक करणारे चौघांवर गुन्हे दाखल केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : भंडारा जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन करणारे व बाळगणारे यांच्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यापैकी अंमली पदार्थ (गांजा) बाळगणारे व वाहतुक करणारे चौघांवर गुन्हे दाखल केले आहे. आज, कारधा पोलिसांनी गांजाची वाहतूक करणारे वाहन आणि १७ किलो गांजा असा साडेतेरा लाखांचा माल पकडला आहे.

जिल्ह्यातील युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व साठवणूक करणारे यांच्यावर धडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलिस ठाणे, गुन्हे शाखा व अधिकारी वर्गाला दिले.

त्यावरून जिल्ह्यातील भंडारा व तुमसर ठाण्यांच्या हद्दीत गुरुवारी (ता. ११) अमली पदार्थ सेवन करणारा सिव्हील लाईन भंडारा येथील निहार प्रदीप महाकाळकर (वय २३) आणि विवेकानंदनगर तुमसर येथील कमलेश नत्थू चोपकर (वय ५१) यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आज, शुक्रवारी (ता. १२) कारधा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी त्यांना मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारधा चौकात नाकेबंदी करून महामार्गाने ये-जा करणावाहनांची तपासणी केली.

यात एका वाहनातून अंदाजे १७ किलो गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख रुपये किंमतीचे वाहन आणि त्यामधून अंदाजे दोन लाख ५५ हजार रुपये किंमतीचा गांजा असा एकूण १३ लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबत कारधा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गणेश पिसाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाईसोबत जनजागृतीसुद्धा

चालू वर्षात आतापर्यंत पोलिसांनी अंमली पदार्थ कायद्यान्वये २६ कारवाया केल्या आहेत. यामध्ये एकूण ४४.६७१ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत पाच लाख ३८ हजार ३३० रुपये आहे. याशिवाय गांजा सेवन करणाऱ्या २२ जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. अंमली पदार्थाचे सेवन करणे हे समाजासाठी किती हानीकारक आहे, याबाबत पोलिस दल जिल्ह्यातील शाळा व कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करत आहे.

जिल्ह्यातून अंमली पदार्थाचा समुळ नाश करण्याकरिता जिल्हावासियांनी अंमली पदार्थ सेवन करणारे, बाळगणारे, विक्री करणारे यांची जिल्हा पोलिसांना माहिती द्यावी. त्यांचे नाव पोलिस दलातर्फे गुप्त ठेवण्यात येईल.

-लोहित मतानी, जिल्हा पोलिस अधीक्षक, भंडारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT