21 people hospitalized poisoned by mutton Incidents at Mhasoba Anji in Arni Sakal
विदर्भ

Food Poisoning : मटणातून २१ जणांना विषबाधा; आर्णी तालुक्यातील म्हसोबा (तांडा), अंजी (नाईक) येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

आर्णी : धार्मिक कार्यक्रमानिमित्त म्हसोबा (तांडा) व अंजी (नाईक) येथे मटणाच्या जेवणाची पंगत होती. जेवण झाल्यानंतर २१ जणांना (दहा पुरुष व ११ महिला) विषबाधा झाली. ही घटना बुधवारी (ता.२२) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. रुग्णांना तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील देऊरवाडा (तांडा) येथील बजरंग प्रल्हाद जाधव यांच्याकडे धार्मिक कार्यक्रम होता. कार्यक्रमात पाहुण्यांसाठी मटणाचे जेवण केले होते. जेवण झाल्यानंतर अनेकांना उलटी, मळमळ सुरू झाली. एका पाठोपाठ एकजणांची तब्येत खालावत होती.

सर्व रुग्णांना तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले. यात प्रगती संतोष जाधव (वय-२१), बजरंग प्रल्हाद जाधव(वय-३५) किरण नीलेश जाधव (वय-३४), पल्लवी बजरंग जाधव (वय-३०), नीलेश दिलीप जाधव (वय-३५), नम्रता गणेश राठोड (वय-८), निर्मला दिलीप जाधव(वय-४०),

भारत संतोष जाधव(वय-२०), दिलीप रामसिंग जाधव(वय-६०), सर्व रा. देऊरवाडी तांडा, उकंडा सूर्यभान राठोड (वय-५०) रा. कामरवाडा, बेबी उकंडा राठोड (वय-४०), सुरेखा बाबूलाल राठोड (वय-४५) रा. धरमगाव, जगदीश बाबूलाल राठोड(वय-२३) रा. धरमगोटा, भारत हरिचंद्र जाधव(३२), दर्पण भारत जाधव (वय-६)रा.अंजीनाईक,

भारती दिनेश राठोड(वय-३०)रा. चिचबर्डी, उदयसिंग सुदाम चव्हाण (वय-४५) रा. धरमगाव, रेखा गणेश राठोड (वय-४०) रा. चिचबर्डी, विजू गणेश जाधव (वय-७) रा.अंजीनाईक, पूजा प्रकाश राठोड (वय-२७) रा. लखमापूर, सिमा जगदीश राठोड (वय-२२) रा. धरमगोटा यांचा समावेश आहे.

रुग्णावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनील भवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बन्सोड, प्राची शिंगारे, सुचिता जांभूळकर, पूजा धूर्वे, ज्योती कदम, ज्ञानेश्‍वरी कुंटकर, हर्षद दूदूल्लरवार, राहुल मोहिते उपचार करीत आहेत. सर्व रुग्णाची तब्येत स्थिर आहे.

आर्णी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक कपिल म्हस्के यांनी रुग्णालयास भेट दिली. विषबाधा झालेले २१ रुग्ण आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल झाल्याची माहिती माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांना मिळाली. त्यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस केली.

विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहे.सर्वांची प्रकृती स्थिर असून सुधारणा आहे. जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- डॉ. सुनील भवरे,वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, आर्णी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT