विदर्भ

जि. प.च्या शाळांची राज्यात गंभीर स्थिती; शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : राज्यात एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाने गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार ४३५ जागा रिक्त (23,000 vacancies for teachers) आहेत. त्याचा परिणाम प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमावर (Impact on Advanced Educational Maharashtra Initiatives) होत आहे. शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. (23,000-vacancies-for-teachers-in-the-state)

खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेतील रिक्त पदांवर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, त्यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासगी अनुदानित शाळांत अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचे पद पुन्हा निर्माण झाल्यास त्या शिक्षकाचे समायोजन पुन्हा त्यांच्या मूळ शाळेत केले जाणार आहे.

मूळ शाळेने त्या शिक्षकाचे समायोजन करून घेण्यास नकार दिल्यास त्यांचे पद रद्द होणार आहे. एकीकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठी असताना दुसरीकडे रिक्त पदांची संख्या त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित रिक्त जागांवर नव्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. खासगी शाळेतील शिक्षकांचे जि. प. शाळेत समायोजन करण्यास जि. प. प्राथमिक शिक्षक संघटनांचा विरोध आहे.

राज्यातील हिंगोली, नांदेड, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गाचे एकही पद रिक्त नाही. मात्र, सहावी ते आठवीच्या वर्गासाठी असलेल्या शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. चंद्रपूर ७८१, हिंगोली ७४०, अकोला ७२१, नागपूर ५९८, गडचिरोली ५४१, अमरावती जिल्हात गटशिक्षणाधिकारी १४, शिक्षण विस्तार अधिकारी ३५, केंद्रप्रमुख १००, उच्चश्रेणी मुख्याध्यापक १००, विषय शिक्षक २६० सहायक शिक्षक ४२० यांचा समावेश आहे.

झेडपीच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे

पहिली ते पाचवी : ८,२६१

सहावी ते आठवी : १४,९९५

नववी ते दहावी : १७९

एक हजारापेक्षा जादा पदे रिक्त असणारे जिल्हे

पालघर : १,५१९

यवतमाळ : १,४०६

नाशिक : १,२८०

पुणे : १,२१५

नांदेड : १,१९७

जालना : १,१२५

(23,000-vacancies-for-teachers-in-the-state)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT