33 Pediatricians will adopt 54 malnutrition children in chandrapur  
विदर्भ

कुपोषण मुक्तीची 'आशा'! 54 कुपोषित बालकांना मिळणार मायेचा आधार..कसा ते वाचा.. 

श्रीकांत पशेट्टीवार

चंद्रपूर:  चंद्रपूर मागास जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर आहे. शासन तीव्र कुपोषितांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबवितात. मात्र मध्यम कुपोषित बालक यात उपेक्षितच राहतात. हीच मध्यम कुपोषित मुले पुढे तीव्र कुपोषित होण्याचा धोका असतो. यासाठी आता चंद्रपुरातील 33 बालरोगतज्ञांनी मदतीचा हात पुढे केला आहे.  

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेच्या जिल्हा सचिव तसेच सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांची भेट बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर यांच्याशी एका कार्यक्रमात झाली. त्यांनी मध्यम कुपोषित मुलांची समस्या बोलून दाखविली. यावेळी अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्याची संकल्पना बाहेर आली. ही संकल्पना बालरोगतज्ज्ञ डॉ. गावतुरे यांनी संघटनेच्या सर्व डॉक्‍टरांना सांगितली. विशेष म्हणजे यातील प्रत्येक डॉक्‍टरांनी अशा मुलांना दत्तक घेण्याचे स्वागत केले.

तब्बल 54 कुपोषित बालकांना मिळणार आधार  

 या उपक्रमानुसार प्रत्येकी एक बालरोगतज्ञ साधारत: दोन कुपोषितबालके दत्तक घेणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर यांची उत्तम साथ लाभत आहे. राज्यात पहिल्यांदाच शासन आणि बालरोगतज्ज्ञ कुपोषण हटविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करीत आहेत. चंद्रपूर तालुक्‍यातील ग्रामीण भागात 212 अंगणवाडी केंद्र असून त्यात 9993 बालके आहेत. यामधील 54 बालके मध्यम कुपोषित तर 9 बालके अतिकुपोषित आहेत. सध्या हा उपक्रम केवळ चंद्रपूर तालुक्‍यातील ग्रामीण भागापूरता मर्यादित आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण जिल्ह्यात असा पॅटर्न राबविण्यात येणार आहे.

अशी सुचली संकल्पना

 या उपक्रमाला "आशा' असे नाव देण्यात आले आहे.  त्यानुसार उद्या बुधवारी 'जागतिक ओआरएस दिनी' याचा औपचारिक कार्यक्रम पार पडणार आहे. ह्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे देखील उपस्थित असतील. 

नेमकी कशी आहे दत्तक प्रक्रिया 

बालरोगतज्ज्ञ महिन्यातून एकदा आपण दत्तक घेतलेल्या मुलांच्या घरी जाऊन त्यांची एकूण सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेतील. तसेच या मुलांना आपल्या रुग्णालयात आणून आणून आरोग्य तपासणी करणार. मुलाच्या आवश्‍यकतेनुसार त्याला भेटवस्तू देणार, त्यांना तातडीच्या उपचाराची गरज पडल्यास यासाठीचा संपूर्ण खर्च डॉक्‍टर उचलणार. म्हणजे एकूणच ही प्रक्रिया केवळ नावापुरती नसून याचा मोठा लाभ गरजू मुलांना होणार आहे. 

यांनी उचलली कुपोषित बालकांची जबाबदारी

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. अपर्णा अंदनकर, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. व्यंकटेश पंगा, डॉ. रवी मोहूर्ले, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. पियुष मुत्यालवार, डॉ. अभय राठोड, डॉ. गोपाल राठी, डॉ. भालचंद्र फालके, डॉ. आशिष धानोरकर, डॉ. सुवर्णा सोंडवले, डॉ. प्रशांत दास, डॉ. राजीव देवईकर, डॉ. राहुल तपासे, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. राम भरत, डॉ. अश्विनी भरत, डॉ. भावेश मुसळे, डॉ. एम. जे. खान, डॉ. रफिक मवानी, डॉ. प्रमोद भोयर, डॉ. राहुल मोगरे, डॉ. सीमा शर्मा, डॉ. अंकुश खिचडे, डॉ. ज्योत्स्ना उमरेडकर, डॉ. प्रियदर्शन मुठाळ, डॉ. सोनाली कपूर, डॉ. प्रीती चव्हाण, डॉ. इर्शाद शिवजी, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. विजय करमरकर यांचा समावेश आहे.  

 संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT