नागपूर: रविवारी सर्वत्र होळीचा उत्साह असताना विदर्भ मात्र तीन अपघातांनी हादरला. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल नऊ जण गतप्राण झाले. यात अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात पती-पत्नीसह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. दुसरा अपघात वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात परतवाडा-धारणी मार्गावर बस दरीत कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. बस झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून, या घटनेत २५ प्रवासी जखमी झाले.
धारणी (जि. अमरावती)पासून दहा किलोमीटर अंतरावर धारणी ते टिटंबा मार्गावर घुटी गावाजवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुकले अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. दिनेश नंदलाल दारसिंबे (वय २९), शारदा दिनेश दारसिंबे (वय २५), युग दिनेश दारसिंबे (वय ६), युवराज दिनेश दारसिंबे (वय ४) सर्व रा. धोत्रा अशी मृतांची नावे आहेत. रविवारी (ता. २४) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली.
धोत्रा गावातील दारसिंबे कुटुंब होळीनिमित्त बाजारात खरेदी करून होळी साजरी करण्याकरिता गावाकडे दुचाकीने (क्र. एमएच २७ बीपी १९५५) परत जात होते. होळीसाठी मनाजोगी खरेदी केल्याने मुले आणि दाम्पत्य आनंदात होते. मात्र, घुटी गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने (क्र. एमएच २९ एआर १४५६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
यात दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती धारणी पोलिसांना दिली. आमदार राजकुमार पटेल, प्रकाश घाडगे हेही रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अपघातग्रस्त दुचाकीचालकाला मदत करण्यासाठी थांबलेल्या कारवर भरधार टिप्पर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात परतवाडा-धारणी मार्गावर बस दरीत कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेत बस झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी २५ प्रवासी जखमी झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.