python rescue sakal
विदर्भ

Python Rescue : अजगराने गिळले चक्क नीलगायीचे पिल्लू

Python Rescue : वाशिममध्ये एका ९ फुट लांबीच्या अजगराने नीलगायच्या पिल्लाला गिळण्याचा प्रयत्न केला. वन्यजीव रक्षकांनी तत्काळ धाव घेऊन अजगराला सुरक्षितपणे रेस्क्यू करून निसर्ग अधिवासात सोडले.

सकाळ वृत्तसेवा

वनोजा : वनोजा येथील दिलीप गावंडे यांच्या शेतात त्यांना एक अजगर दिसून आला. तसेच तो नीलगायचे पिल्लु गिळत होता पण शेतकऱ्याची चाहूल लागल्यामुळे त्याने भक्ष सोडून तो बाजूला निघून गेला हे सर्व दृश्य पाहून दिलीप गावंडे यांची तारांबळीच उडाली.

त्यांनी तत्काळ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिमचे सदस्य व सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक शुभम हेकड यांना माहिती दिली. यांनतर शुभम लगेच आपले सहकारी शुभम डुकरे यांच्या सह घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली असता एक अंदाजे ९ फूट लांबीचा अजगर त्यांना सोयाबीनमध्ये नीलगायचे पिल्लू गिळताना दिसले.

यांनतर त्यांनी अतिशय शिताफीने अजगराला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. संबधित माहिती कारंजा मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी अमित शिंदे यांच्या सह वनपाल श्री. सुदर्शन सोनवणे यांना दिली. यांनतर वनरक्षक मनिष हुमने यांनी रीतसर पंचनामा करून सदर अजगराला निसर्ग अधिवासात मुक्त केले.

गेल्या २ महिन्यात या संघटनेच्या सदस्यांनी तब्बल ६ मोठ-मोठ्या अजगारांना पकडून निसर्ग अधिवासात मुक्त केले. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वन्यजीव सप्ताहामध्ये अनेक सापांना जीवदान देण्याचे कार्य केले आहे. यामध्ये नाग गवत्या व अजगर सापाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT