निलज बु. (जि. भंडारा) : जनावराचा साधा पाय पडला जखम होते. मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे मात्र तब्बल दीडशे गायींचा कळप अंगावरून जाऊनही गुराख्याला साधे खरचटही नाही. गोधन म्हणजेच बलीप्रतिपदेच्या दिवशी जांभोरा येथे चित्तथरारक अनुभव आला. दीडशे वर्षांपासून ही परतेकी कुटुंबाने जोपासली बलीप्रतिपदेच्या विविध पद्धतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते.
रानावनात चारण्यासाठी नेण्याचे काम पूर्वी गोवारी समाजातील नागरिक करायचे; त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो. गाईला अंघोळ घालून जनावरांची जनावरांची मिरवणूक काढून अंगणात ठेवलेले शेणाचे गोधन गाईच्या पावलाने उधळले जाते. जमिनीवर पालथे झोपून अंगावरून संपूर्ण गोधन चालवून घेण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील शेतकऱ्यांनी १५० वर्षांपासून अखंडितपणे सुरू ठेवली आहे.
शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून २ वाजतापर्यंत चाललेल्या या चित्तथरारक गोधन पूजेत जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी (३४) यांच्या अंगावरून दीडशे गाईंचा कळप धावत गेला. ते मात्र निर्धास्त व सुखरूप होते. त्याला कोणतीही दुखापत व इजा झाली नाही. मोहाडीपासून ३५ किमी अंतरावर तालुक्याच्या टोकावर जंगल पहाडाच्या कुशीत जांभोरा हे हजार लोकवस्तीचे गाव वसले आहे.
या गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावात १०० टक्के शेतकरी असून त्या सर्वांकडे मिळून दीडशे ते दोनेशे गायी आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून गोपालन केले जाते गावातील सर्व गाई चारायला नेण्याचे काम पिढ्यानपिढ्या परतेकी कुटुंबाकडे आहे. १५० वर्षांपूर्वी गोधन अंगावरून चालवण्याची प्रथा परतेकी कुटुंबाने सुरू केली. ही प्रथा आजही सुरूच आहे.
असा असतो कार्यक्रम
गावातील सर्व गायींना अंघोळ घातली जाते. शिंग रंगवून व नवीन गेटे, दावे बांधून त्यांना सजविले जाते. तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो. क्षणातच संपूर्ण गोधन त्याच्या अंगावरून जाते. तरी देखील गुराख्याला कुठलीही इजा होत नाही. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या उत्कंठेने जांभोरा येथे हजेरी लावतात. यावेळी आजवर गुराख्याला गाई अंगावरून गेल्याने इजा झाल्याची घटना ऐकीवात नसल्याचे लोक सांगतात.
"गोमातेनेच आम्हाला पोटापाण्याचे व जगण्याचे साधन दिले. आज तिच्या आशीवार्दामुळे आम्ही तुम्ही जिवंत आहोत. ही अंधश्रद्धा नाही. गोमातेवर असणारी निष्ठा व श्रद्धा यामुळे यातून कोणतीही धोका व इजा आजवर झाली नाही. गेल्या शेकडो वर्षांपासून पणजोबापासून ही प्रथा अखंडपणे सुरू आहे."
- विनायक परतेती, जांभोरा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.