Chikhali Crime sakal
विदर्भ

Chikhali Crime : पळविलेल्या मुलीची बंगालमधून सुटका; चिखली पोलिसांची कारवाई, आरोपी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

चिखली : भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेलेल्या अवघ्या १२ वर्षीय चिमुकलीस फूस लावून पळविणाऱ्या आरोपीचा शिताफीने शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. थेट पश्चिम बंगालमध्ये जात तेथून अल्पवयीन मुलीची सुटका चिखली पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी मुन्ना शहा मुबारक शहा नामक आरोपीस ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी एक १२ वर्षीय मुलगी ता.१६ सप्टेंबर रोजी नातेवाइकांसमवेत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेली होती. येथून ती गायब झाली होती. शोध घेऊनही ती न सापडल्याने नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यात एका व्यक्तीवर संशयही व्यक्त केला होता. त्यामुळे शहरात तणावाची शक्यता निर्माण झाली होती.

प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके रवाना केली होती. गोपनीय व तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व पीडित पश्चिम बंगालमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहाण, पोलिस नायक अमोल गवई, महिला पोलिस कॉन्स्टेबल रूपाली उगले यांचे पथक पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. पथकाने ३ दिवस शोधमोहीम राबवून आरोपी मुन्ना शहा मुबारक शहा याच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली.

आरोपीस २७ सप्टेंबर रोजी पोलिस स्टेशनला आणण्यात आले. आरोपीला न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई ठाणेदार संग्राम पाटील, एपीआय स्वप्नील तायडे, राहुल पायघन, पंढरीनाथ मिसाळ, रोहिदास पुढरे, प्रशांत धंदर, सागर कोल्हे, नीलेश सावळे, सूर्यकला म्हस्के आदी सहकाऱ्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Helicopter Crash in Pune: बापरे! ते हेलिकॉप्टर मुंबईत सुनिल तटकरेंना घ्यायला जात होतं, त्यापूर्वीच मोठी दुर्घटना

Helicopter Crash In Pune : पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले! तीन जणांचा मृत्यू

Nashik Traffic Route Change : मुंबई नाका, भगूर येथे यात्रोत्सव; नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल

Samsung Strike: सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच; पोलिसांनी 900हून अधिक कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

Star Pravah : आता उलगडणार कथा साडेतीन शक्तीपीठांची ; देवी रेणुका अवतरणार लेकरांसाठी

SCROLL FOR NEXT