संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

महिन्याचे १४ हजार रुपये पडले दोघांना महागात, काय आहे प्रकरण...वाचा...

प्रदीप बहुरुपी

वरुड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवडीच्या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावे मजुरीची रक्कम काढून त्या बदल्यात आपला हिस्सा मागणाऱ्या सरपंच व सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुक्‍यातील बेसखेडा ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याच्या कडेला वृक्षलागवडीचे काम सुरू आहे. या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावाने मजुरीची रक्कम शासनाकडून काढली जात होती व ती जमा करून त्यापैकी प्रत्येकी १० हजार रुपये दरमहा दोघांचे २० हजार रुपये महिन्याला द्यावे, अशी मागणी बेसखेडा ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू यावले व सचिव पवन सोमवंशी यांनी रोजगार सेवकाला केली. तडजोडीअंती हा व्यवहार सात हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे दोघांचे १४ हजार असा ठरला. रोजगारसेवक यांच्या माध्यमातून हे बोगस काम केले जात होते व मजुरीची रक्कम मिळताच सरपंच व सचिव त्या रकमेतील आपला हिस्सा रोजगार सेवकांकडून मागून घेत होते.

यासंदर्भात संबंधित रोजगार सेवकाने सात सप्टेंबरला लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली, त्यानुसार मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बेसखेडा ग्रामपंचायतच्या सरपंचांनी पंचायत समितीजवळील चहाच्या टपरीनजीक प्रत्येकी सात हजार रुपयांप्रमाणे दोघांचे ठरल्यानुसार १४ हजार रुपये ग्रामसेवकाच्या उपस्थितीत पंचांसमक्ष स्वीकारले. त्याच वेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक पंजाब डोंगरदिवे, पोलिस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवींद्र जेधे, रूपाली पोहनकर, पंकज बोरसे, शैलेश कडू, राजेश कोचे, अकबर हुसेन यांनी केली.
 

संपादन - नरेश शेळके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT