Accident News esakal
विदर्भ

Accident News : वऱ्हाडाची बस नाल्यात कोसळली; महिलेचा मृत्यू, २३ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर, मूल : लग्नकार्य आटोपून वऱ्हाडांना गावाकडे घेऊन जाणारी खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर २३ जण जखमी झाले. ही घटना बल्लारपूर तालुक्यातील किन्ही नाल्यावर शुक्रवारी (ता. १२) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

मृत महिलेचे नाव सुनंदा हरिदास मडावी (वय ५० रा. नांदगाव घोसरी) असे आहे. या घटनेमुळे नांदगाव घोसरी गावात शोककळा पसरली आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मूल तालुक्यात नांदगाव घोसरी हे गाव येते. या गावातील विलास मडावी यांच्या मुलाचा विवाह १२ मे रोजी बल्लारपूर येथे होता. लग्नकार्य असल्याने मडावी कुटुंबीयांनी वऱ्हाड्यांसाठी खासगी बस केली होती. शुक्रवार (ता. १२) जुनासुर्ला येथील स्नेहल मडावी हा एमएच ३४ एबी ८०७५ क्रमांकाची खासगी बस घेऊन गावात आला.

लग्नासाठी मडावी यांचे नातेवाईक, गावातील जवळचे असे पन्नास जण या खासगी बसने बल्लारपुरात सुखरूप पोहोचले. सायंकाळपर्यंत लग्नकार्य आटोपले. वऱ्हाडांना घेऊन खासगी बस नांदगाव घोसरीला जाण्यासाठी निघाली. बल्लारपूर-गोंडपिंपरी मार्गावर असलेल्या येनबोडीपर्यंत वाहन सुरक्षित गेले. मात्र, पुढे असलेल्या वळणावरील नाल्याजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटले.

त्यामुळे वऱ्हाडी असलेली खासगी बस नाल्यात कोसळली. यावेळी वऱ्हाड्यांनी एकच हाहाकार केला. त्यावेळी रात्रीचे दहा वाजले होते. बस नाल्यात पडल्याची माहिती ये- जा करणाऱ्यांना दिसली. त्यांनी तातडीने बल्लारपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले.

रात्रीची वेळ असल्याने बचावकार्य करताना पोलिसांना अडचणीचा सामना करावा लागला. या अपघातात सुनंदा मडावी या महिलेचा मृत्यू झाला. समीर बावणे, दामोधर हजारे, कविता चलाख, मीराबाई कामटकर हे गंभीर जखमी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Killed Baba Siddique: 2019 मध्ये हत्या, तुरुंगात बिश्नोई गँगशी ओळख अन् मुंबईत गोळीबार... कोण आहे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा कर्नेल सिंग?

बाबा सिद्दीकींना संपवण्यासाठी २५ दिवसांचं प्लॅनिंग, पार्सलद्वारे पिस्तूल अन् ॲडव्हान्स पेमेंट; आरोपींची चौकशीत खळबळजनक माहिती!

Latest Maharashtra News Updates LIVE: सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढली

Smartphones in October : यंदाचा ऑक्टोबर मोबाईल प्रेमींसाठी खास; 25 हजारांच्या आत या नामवंत कंपन्यांचे ब्रँड 5G स्मार्टफोन,एकदा बघाच

Ye Re Ye Re Paisa 3 :नव्या वर्षात रिलीज होणार ये रे ये रे पैसा 3 सिनेमा, पुन्हा एकदा त्याच कलाकारांबरोबर पाहायला नवी धमाल

SCROLL FOR NEXT