accident truck One person including two female doctors died hospital traffic police wardha esakal
विदर्भ

Accident News : ट्रकवर आदळली मोटार; दोन महिला डॉक्टरांसह एक जण जागीच ठार

दोन डॉक्टर मैत्रिणींचा दुर्देवी अंत

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : यवतमाळकडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रकवर भरधाव मोटार आदळली. या भीषण अपघातात दोन महिला डॉक्टरांसह एक जण जागीच ठार झाला. ही घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गावर घडली. डॉ. ज्योती क्षीरसागर, डॉ. फाल्गुनी सुरवाडे आणि भरत क्षीरसागर (सर्व रा. वाशीम) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक यवतमाळकडून नागपूरकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेली वॅगन आर मोटार ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात मोटारीमधील तिघेही जागीच ठार झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली.

भरत क्षीरसागर हे मुंगळा येथील श्री मोरेश्वर विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची मुलगी डॉ. ज्योती क्षीरसागर ही डॉ. आर. आर. कांबे दंतवैद्यकीय महाविद्यालय कान्हेरी सरप (जि. अकोला) च्या एमडीएस द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती तर तिची मैत्रीण डॉ. फाल्गुनी सुरवाडे ही त्याच महाविद्यालच्या बीडीएसच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT