खामगाव (जि.बुलडाणा) : जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाची जोड असल्यास कोणत्याही परिस्थितीत सर्वकाही शक्य आहे असे म्हटले जाते. त्याचीच प्रचिती आज आली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये खामगाव तालुक्यातील ग्राम वाडी या छोट्याशा गावातील मुलाने घवघवीत यश संपादन केले आहे. प्रसाद ठाकरे असे त्याचे नाव आहे. प्रसाद हा अवघ्या २७ वर्षांचा आहे. इतक्या कमी वयात त्याने न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे.
प्रसाद ठाकरे याचे बारावी पर्यंतचे शिक्षण खामगाव येथील जे. व्ही. मेहता नवयुग विद्यालय येथे झाले. चार वर्षे एलएलबी व दोन वर्षे एलएलएमचे शिक्षण त्याने शेळके विधी महाविद्यालय येथून पूर्ण केले. यानंतर त्याने पुणे येथील क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला व पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा उत्तीर्ण केली. २५० गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये १०९ व मुलाखतीमध्ये ३२ गुण मिळाले आहेत.
असे का घडले? - शेतकऱ्याने कुटुंब काढले विक्रीला
१५ हजार विद्यार्थ्यांतून निवड
राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त १९० विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. प्रसाद ठाकरे याचे वडील हिंदुस्थान लिव्हर कंपनीत कार्यरत असून, मुळगावी असलेली शेती सुध्दा ते करतात. या यशानंतर परिवारासह प्रसादला देखील यावेळी आनंदाश्रू अनावर झाले.
हेही वाचा - अकोल्याचा दर्शन आयपीएलमध्ये झळकणार
वडिलांनी दिली प्रेरणा
वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया प्रसादने ‘सकाळ’शी बोलतांना दिली. दरम्यान, मुंबई येथील उथ्थान ज्युडीशियल ॲकेडमी येथे प्रशिक्षण झाल्यानंतर जिल्हास्तरावर न्यायाधीश म्हणून त्याची नियुक्ती केली जाईल. प्रसादच्या या यशाने त्याच्या नातेवाइकांसह गावात देखील आनंदाला उधाण आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.