अकोला : कुणाला मधुमेह, कुणाला उच्च रक्तदाब, तर कुणाला हृदयाचा त्रास...पण या आजारांचा बाऊ न करता खाकी वर्दीतील हजारो ‘फायटर्स' कोरोनाला हरवण्यासाठी रात्रं-दिवस कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे सध्या अकोला दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने आणि ग्रासले असले तरी हे कोरोना फायटर्स जीवाची बाजी लावून २४ तास ड्युटी बजावत आहेत.
कोरोना रोखण्यासाठी देश व राज्यभरातील पोलिस ढाल बनून आपले कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावत असताना राज्यातील सुमारे ८०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले. अकोला शहर व जिल्ह्यात २४०० पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. त्यात बहुतेक कर्मचाऱ्यांनी पन्नाशी पार केली आहे. त्यातील काहींना मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच हृदयाचे आजार आहेत. मात्र, संकटाच्या काळात या आजारांचा बाऊ न करता खाकी वर्दीतील हे फायटर्स अकोलेकरांची ढाल बनून कर्तव्य बजावत आहेत.
सलग १८ - १८ तास काम करणाऱ्या या फायटर्सना प्रकृतीचे कारण पुढे केले ना आपल्या कुटुंबाचे. विनाकारण रस्त्यांवर फिरणारे हुल्लडबाज असोत की, भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करणारे नागरिक, या सर्वांना कधी प्रेमाने, तर कधी दंडुक्याचा धाक दाखवून त्यांना या वॉरियर्सने घरात बसण्यास भाग पाडले.
पन्नाशीच्या वरील पोलिसांना कार्यालयीन काम
५५ पेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना रजा देण्याचे सरकारचे निर्देश आहेत. असे असले, तरी ५५ पेक्षा अधिक वय असलेले अनेक पोलिस रजा न घेता स्वच्छेने कर्तव्य बजावत आहेत. अशा वयस्क असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना फिल्डवर चे काम न देता कार्यालयीन काम देण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा उताऱ्याची गरज
राज्यातील पोलिस कर्मचारी पॉझिटिव आढळत असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस आढळत असल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांना गुळवेल, अश्वगंधा, पिंपळी, कंटकरी, तुरटी, तुळशी, जेष्ठ मध, सुंठ, हळद, आदी नऊ औषधी वनस्पतीपासून आयुर्वेदिक काढ तयार केलेला रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा काढा देण्याची गरज आहे हा प्रयोग सध्या राज्यातील पंढरपूर येथे राबविल्या जात आहे.
रामदासपेठ पोलीस ठाणे कोरोनाच्या रडारवर
रामदासपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते राहत असलेला परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे रामदासपेठ पोलिस ठाण्यात याआधीही एएसआय पदाच्या पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला होता त्यानंतर आज पुन्हा पोलीस ठाणे मधील कॉन्स्टेबल पॉझिटिव्ह आढळल्याने रामदासपेठ पोलिस ठाणे कोरोनाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.
सर्वच कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंग सुरू
रामदास पेठ पोलिस ठाण्यातील पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे सोबतच आता इतरही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करणे अनिवार्य ठरणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.