अकोला,: दोन आठवड्यावर खरीप येऊन ठेपला असून, अजूनही शेतकऱ्यांच्या घरात लाखो क्विंटल कापूस पडून आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांची कोंडी होत असून, त्यासाठी कापूस खरेदी केंद्रांचे उदासीन धोरणच कारणीभूत ठरत आहे.
जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 31 हजार 416 शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्यांच्यापैकी केवळ 12 टक्के शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला असून, अजूनही 23 हजार 278 शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बाकी आहे.
यंदा कापूस हंगाम लांबल्याने, उशिरापर्यंत कापूस निघाला. कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुद्धा संथ गतीने राबविण्यात आली आणि नंतर लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारचे कापूस खरेदी केंद्र बंद झाले. त्यामुळे हंगामातील निम्म्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून होता आणि शेतकऱ्यांचीही मोठी आर्थिक कोंडी झाली होती. त्यानंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात 22 एप्रिलपासून काही अटीशर्तींसह कापूस खरेदी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून काही केंद्रांवर प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.
परंतु ही खरेदी प्रक्रिया राबवतानाही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे, ग्रेडचे उदासीन धोरण आणि खरेदी प्रक्रियेतील निकष शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहेत. जिल्ह्यात सीसीआय व कॉटन फेडरेशद्वारे कापसाची खरेदी सुरू आहे. मात्र, त्यावर दिवसभरातून नाममात्र शेतकऱ्यांचा एफएक्यू दर्जाचाच कापूस खरेदी केला जातोय. खरेदी प्रक्रियेची ही गती लक्षात घेता, जिल्ह्यातील संपूर्ण कापूस खरेदीला किमान तीन ते चार महिने लागू शकतात.
त्यामुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी व जिल्हा प्रशासनाने कापूस खरेदी प्रक्रियेत स्वतः लक्ष घालावे व प्रक्रिया गतिमान करण्यासाठी उपाय योजना करावी आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस मान्सूनच्या आगमनापूर्वी खरेदी करून, कापूस उत्पादकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी तसेच शेतकरी संघटनाद्वारे केली जात आहे.
खरेदी केंद्रांचे उदासीन धोरण भोवणार
जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी सीसीआयला 19 केंद्रांची मंजुरी मिळाली असून, त्यापैकी पाच केंद्र पूर्णता बंद आहेत. सुरु असलेल्या 14 केंद्रांपैकी केवळ पाच केंद्रांवर नियमीत कापूस खरेदी सुरू असून, उर्वरित नऊ केंद्र दोन दिवस सुरू तीन दिवस बंद, अशा पद्धतीने प्रक्रिया राबवित आहेत. कॉटन फेडरेशनचे सुद्धा केवळ दोन केंद्र नेहमीच सुरू आहेत. कापूस खरेदी केंद्राच्या या उदासीन धोरणामुळे अजूनही जिल्ह्यात लाखो क्विंटल कापूस खरेदी बाकी असून, हे धोरण कापूस उत्पादकांना डबघाईस येण्यास कारणीभूत ठरू शकते.
कृ.उ.बा.स. सीसीआय नोंदणी सीसीआय खरेदी
केंद्र शेतकरी कापूस (क्विं)
अकोला 6353 407 11784
अकोट 12519 644 2103
तेल्हारा 3120 311 9000
बाळापूर 2844 246 6346
पातूर 1284 211 4887
बार्शीटाकळी 1732 480 9268
मूर्तिजापूर 1613 50 1258
एकूण 29465 2349 44545
कृ.उ.बा.स. फेडरेशन नोंदणी फेडरेशन खरेदी
शेतकरी कापूस (क्विं)
अकोला 1108 667 19720
तेल्हारा 843 121 2379
एकूण 1951 788 22099
78 टक्के शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी बाकी
जिल्हाभरातून सीसीआय व फेडरेशनच्या कापूस खरेदी केंद्रांवर 31 हजार 416 कापूस उत्पादकांनी नोंदणी केलेली आहे. त्यांच्यापैकी आतापर्यंत केवळ 3137 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला असून, अजूनही 23 हजार 278 शेतकऱ्यांकडील लाखो क्विंटल कापसाची खरेदी बाकी आहे.
फेडरेशनद्वारे 40 टक्के खरेदी
सीसीआय केंद्रांकडे एकूण आठ ग्रेडर संख्या आहे तर, कॉटन फेडरेशनकडे केवळ दोनच ग्रेडर उपलब्ध आहेत. मात्र कॉटन फेडरेशनद्वारे आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 40 टक्के शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला आहे तर, आठ ग्रेडर असतानाही सीसीआयकडून केवळ 12 टक्के शेतकर्यांचाच कापूस खरेदी करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.