विदर्भ

वर्धेत दारूबंदीची अंमलबजावणी अन् शाळेच्या आवारालगतच मिळते दारू

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्ध्यात खुलेआम दारू मिळत असल्याचे अनेकांना माहीत आहे. आता तर दारूविक्रेत्यांनी शाळेचा आवार आपल्या ताब्यात घेतल्याने गावकरी संतप्त झाले आहे. रोहणा येथे असलेल्या शाळेच्या आवारात दारूची विक्री होत असल्याने मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या संदर्भात पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असली तरी त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

रोहणा या गावात गल्लीबोळातील दारूविक्रीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आणि बसस्थानक परिसरातच दारू अड्डा सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी तळिरामांची गर्दी उसळत असल्याने दारूविक्रीला पोलिसांचाच आशीर्वाद असल्याची ओरड गावकऱ्यांकडून होत आहे. गावात सर्वत्र दारू विक्रेत्यांचे प्रमाण वाढत असल्याने याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

या दारू विक्रेत्यांना नागरिकांनी हटकले असता ते अंगावर चाल करून जातात. ‘पोलिस आमचे काहीही बिघडवू शकत नाही’, अशी धमकी देत असल्याने गावातील युवक व मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूविक्रीचे तयार झालेले अड्डे त्वरित बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

अनेक मुले गेले आहारी

सध्या आठवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत. या शाळेत जाणारी मुलेही या दारूच्या आहारी गेल्याने पालकांत रोष व्यक्त करण्यात येत आहे. पालकांच्या हातून अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT