Amravati Lok Sabah Election 2024 
विदर्भ

Amravati Lok Sabah Election 2024 : वंचित, रिपाइं निवडणूक रिंगणातून बाहेर; विजयाचे समीकरण ठरवणारी आंबेडकरी मतांवर लक्ष

Amravati Lok Sabah Election 2024 : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आंबेडकरी विचारांच्या मतांना विशेष महत्त्व आहे.

कृष्णा लोखंडे

अमरावती : लोकसभेच्या रिंगणातून १९ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असले तरी रिंगणात विक्रमी संख्येत उमेदवार आले आहेत. गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत सहा टक्क्यांच्या जवळपास मत मिळवणारी वंचित बहूजन आघाडी व गवई यांची रिपाइं यावेळी निवडणूक रिंगणात नसल्याने या पक्षांची मते कुणाच्या पारड्यात जातील, याकडे लक्ष वेधले गेले आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आंबेडकरी विचारांच्या मतांना विशेष महत्त्व आहे. एकूण मतदार संख्येच्या १८ टक्के मतदार अनुसूचित जातीची असून १४ टक्के मतदार अनुसूचित जमातीची आहेत. तर १४ टक्के मुस्लीम मतदार आहेत. राजकीयदृष्ट्या या मतांना विशेष महत्त्व असून या मतदारांचा कौल निकालावर प्रभाव टाकू शकणारा आहे. त्यामुळेच वंचित बहूजन आघाडीने अमरावती मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. महाविकास आघाडीत सहभागी होऊन हा मतदारसंघ पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही.

त्यातच रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी या मतदारसंघात उडी घेतली आहे. जाहीर केलेल्या उमेदवारास अर्ज न भरण्यास सांगून आनंदराज यांना पाठिंबा घोषित करण्याची वेळ वंचितवर आली. त्याचवेळी रिपाइं गवई गटाचे डॉ. राजेंद्र गवई यांनी स्वतःचा दाखल केलेला अर्ज मागे घेत रिंगणातून माघार घेतली. त्यांनी अपक्ष उमेदवाराचे समर्थन केल्याचे सांगण्यात येत असले तरी तसे अधिकृत पत्र काढलेले नाही.

रिपाइं गवई गटास २००९ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने समर्थन दिले होते. त्यावेळी या पक्षाचे उमेदवार रा. सू. गवई यांनी ३४ टक्क्यांवर मते घेतली. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइं (गवई) गटाकडून डॉ. राजेंद्र गवई उमेदवार होते. त्यांना केवळ ५.४ टक्के मते मिळाली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारास समर्थन देत रिंगणात उडीच घेतली नाही. तर यावेळी उडी घेतल्यानंतर माघार घेतली.

गतवेळच्या (२०१९) लोकसभा निवडणुकीत आघाडीचे गणित बिघडवणाऱ्या वंचित बहूजन आघाडीने यंदाही तयारी केली होती. मात्र ऐनवेळी अर्जही दाखल न करता माघार घेतल्याने वंचितच्या भूमिकेने राजकीय क्षेत्रातील भूवया उंचावल्यात. राजकीय समीकरणात लक्षणीय भूमिका बजाऊ शकणाऱ्या या दोन्ही आंबेडकरी पक्षांनी रिंगणातून माघार घेतल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय धुरिणांचे विशेष लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT