रेशीम  sakal
विदर्भ

अमरावती : रेशीम बाजाराला मुहूर्ताची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देणाऱ्या रेशीम बाजाराच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित होत नसल्याची स्थिती आहे.

कृष्णा लोखंडे

अमरावती : शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देणाऱ्या रेशीम बाजाराच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित होत नसल्याची स्थिती आहे. बाजार समितीने प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या मदतीने बडनेरा येथे तयार केलेल्या बाजाराला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे विभागात रेशीम व्यवसाय वाढण्यास हा बाजार सहायक ठरणार आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने बडनेरा येथील उपबाजाराच्या पाच एकर जागेवर रेशीम व फूलबाजार तयार केला आहे. प्रादेशिक रेशीम कार्यालयाने यासाठी रेशीम उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. विभागीय पातळीवर पाचही जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेशीम व फूलबाजार सुरू होण्यास केवळ उद्घाटनाची अडचण आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन प्रस्तावित आहे. मात्र व्यस्ततेमुळे त्यांनी अद्याप प्रादेशिक रेशीम कार्यालय व बाजार समितीला तारीख दिलेली नाही. त्यांची तारीख मिळत नाही तोपर्यंत बाजार समिती व रेशीम कार्यालय कार्यक्रम निश्चित करू शकत नाहीत.

अमरावती विभागातीला पाचही जिल्ह्यांत ८८५ एकर क्षेत्रात तुतीची लागवड आहे. २ हजार २१२ शेतकरी रेशीम व्यवसायात गुंतले आहे. त्यांना जळगाव, बारामती, जालना, हैदराबाद, सिकंदराबाद, रामनगर, बंगरुळु येथे विक्रीसाठी जावे लागले. या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी बडनेरा येथे बाजार सुरू करण्यात आला आहे. हा बाजार राष्ट्रीय महामार्गावर असून बडनेरा रेल्वे स्थानकानजीक आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व खरेदीदारांना वाहतुकीसाठी अत्यंत सोयीचा आहे. दरम्यान बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी येत्या पंधरा दिवसांत रेशीम बाजाराचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले.

अमरावतीसाठी आग्रह

बडनेरा उपबाजाराच्या जागेवरील रेशीम बाजार अमरावतीला हलविण्यात यावा, असा आग्रह बाजार समितीच्या काही संचालकांचा आहे. त्यांनीही अडचणी आणण्यास सुरुवात केली आहे. अमरावती बाजार समितीत योग्य जागा नसताना व वाहतुकीची समस्या निर्माण होत असतानाही त्यांचा केवळ राजकीय हेतूतून आग्रह सुरू आहे.

व्यवसाय वाढेल

बडनेरा येथे बाजार झाल्यास पाचही जिल्ह्यांतील रेशीम उत्पादकांना सोयीचे होणार आहे. हा बाजार येथे झाल्यानंतर या भागात लागवड वाढून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय मिळू शकेल. आतापर्यंत बाहेर जाऊन माल विकावा लागत होता, बाजार झाल्यावर तो स्थानिक पातळीवर विकल्या जाऊन रेशीम उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया रेशीम उत्पादक शेतकरी पौर्णिमा सवाई यांनी दिली.

रेशीम बाजाराचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे प्रस्तावित आहे. त्यांची वेळ मागण्यात येत आहे. मात्र व्यस्ततेमुळे ती मिळत नसल्याने बाजार समितीचे सभापतीही वेळ देत नाहीत. महिन्याच्या दहा, वीस व तीस तारखेलाच उद्घाटन घेता येऊ शकते.

- महेंद्र ढवळे, प्रादेशिक रेशीम अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT