Amzari Shahapur will honey village GI tag Honey branding tourism amravati sakal
विदर्भ

अमरावती : आमझरी-शहापूर होणार ‘मधाचे गाव’; जीआय मानांकनासाठी प्रयत्न

आमझरी पर्यटन संकुल असलेले गाव आता मधाचे गाव होणार आहे. या गावात होणाऱ्या मधाचे ब्रॅण्डिंगही केले जाणार असून, त्यासाठी जीआय मानांकन घेतले जाणार

नारायण येवले

चिखलदरा : तालुक्यातील आमझरी पर्यटन संकुल असलेले गाव आता मधाचे गाव होणार आहे. या गावात होणाऱ्या मधाचे ब्रॅण्डिंगही केले जाणार असून, त्यासाठी जीआय मानांकन घेतले जाणार आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मदतीने आमझरी-शहापूर गाव मधाचे क्लस्टर निर्मितीचा प्रस्ताव मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी मोठ्या प्रमाणावर जंगली मध संकलन करण्याचा व्यवसाय करीत आहेत. स्थानिक आदिवासींना रोजगार मिळावा, या हेतूने चिखलदरा व धारणी तालुक्यातील सुमारे दीडशे मध संकलकांना अहिंसक पद्धतीने मध काढण्याचे प्रशिक्षण देऊन मधसंकलन करण्यासाठी टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे.

याशिवाय खादी ग्रामोद्योग आयोगाद्वारे स्फूर्ती योजनेच्या माध्यमातून मधाचे शुद्धीकरण, बॉटलिंग, पॅकिंगची व्यवस्था करण्यात आली असून, स्फूर्ती क्लस्टरमध्ये १२० नोंदणीकृत मध संकलकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी हनी कलेक्शन शुद्धीकरण सेंटरची निर्मिती शहापूर येथे व सिपना महाविद्यालयात झालेली आहे. चिखलदरा तालुक्यातील मधाला योग्य भाव मिळावा, यासाठी आमदार राजकुमार पटेल प्रयत्नशील आहेत. मेळघाटातील (रॉकबी) या आग्या, सातेरी प्रजातीचे मध आदिवासींकडून मोठ्या प्रमाणावर संकलन करण्यात येते.

राज्य शासनाच्या मधुकेंद्र योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मधाच्या विक्रीसाठी आमझरी पर्यटन संकुल, चिखलदरा पर्यटनस्थळ, शहापूर येथे मध विक्री केंद्र खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमझरी पर्यटन संकुल असलेल्या गावाच्या विकासासाठी सर्व योजनांचे एकत्रीकरण करून विकास आराखडा तयार करण्याची ही संकल्पना खादी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविली आहे.

सेंद्रिय मध निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, वनपरिक्षेत्राधिकारी वन्यजीव विभाग, पंचायत समिती संवर्ग विकास अधिकारी, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, केवीआयसी स्फूर्ती क्लस्टर यांची प्रशासकीय समिती गठित करण्यात आली आहे. मेळघाटातील मल्टीफ्लोरा असलेल्या मधामध्ये औषधी गुणधर्म जास्त असल्याने कोरोना काळात मधाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

मधमाशी निसर्गातील महत्त्वाचा घटक

मधमाशी हा निसर्गातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मधमाशी आपल्याला मध आणि मेण मिळवून देण्यात मदत करतेच, पण अजूनही एक असे काम करते, ते म्हणजे परागीभवन. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडत असताना मधमाश्या परागकणाचे वहन करण्याचे काम करतात. ज्यामुळे कितीतरी वनस्पतींच्या फलधारणेचा मार्ग सुकर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT