Anil Deshmukh said does not work under police pressure political news 
विदर्भ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड कुठे आहे हे माहिती नाही; तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पोलिस दबावात काम करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, पोलिस कुठल्याही दबावाखाली तपास करीत नाही. या प्रकरणाची नियमानुसार चौकशी होणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

टीकटॉक स्टार पूजा चव्हाणने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. सध्या राज्यभर तिच्या आत्महत्येचीच चर्चा आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडीचे मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राठोड यांचा तब्बल आठ दिवसांपासून पत्ता नसल्याने ते कुठे गेले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला उत्तर देताना संजय राठोड कुठे आहे हे माहिती नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

काल देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिस दबावात असल्याने कुठलीही कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले होते. ऑडिओ क्लिप्सची सत्यता तत्काळ तपासली जावी अशी आमची मागणी आहे. या क्लिपमधील आवाज कुणाचा आहे जगाला माहीत आहे. मात्र, पोलिसांनी ते समोर आणायला हवे.

या प्रकरणात पोलिस सूमोटो कारवाई करीत गुन्हा दाखल करू शकतात. मात्र, पोलिस जाणीवपूर्वक कारवाई करीत नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी म्हणजे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले हे त्यांना कळेल, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. याला उत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरील भाष्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT