यवतमाळ : युवा नेत्रतज्ज्ञ डॉ. सुनील मोतीराम भड (Dr. Sunil Bhad) यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करून ऑटोमॅटिक यंत्र (Automatic device) बनविले आहे. त्यामुळे रेटिना सर्जरी आता अधिक सुलभ झाली आहे. या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी इतिहास घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाला केंद्र शासनाच्या पेटंट विभागाने मंजुरी दिली आहे. (Automatic device facilitates retinal surgery Yavatmal news)
डॉ. सुनील भड यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली. नागपूर येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून रेटिना यामध्ये एम.एस.ची पदवी मेरिटमध्ये उत्तीर्ण केली. पुढे जागतिक कीर्तीच्या स्वामी अरविंद आय हॉस्पिटल तामिळनाडू येथून डॉ. भड यांनी रेटिना सर्जरी सुपर स्पेशालिटीचे शिक्षण पूर्ण केले.
नेत्ररोग व रेटिना विषयावर त्यांचे आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून विविध लेख प्रकाशित झाले आहेत. जागतिक अंधत्वाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. सुनील यांनी संशोधनास सुरुवात केली आणि रेटिना सर्जरीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ‘डिव्हाइस फॉर स्केललेरोटॉओ स्युटुरिंग’ या उपकरणावर यशस्वी संशोधन केले. या उपकरणामुळे नेत्ररुग्णांचा त्रास कमी होईल व नेत्रतज्ज्ञांचा वेळ वाचेल, असे डॉ. सुनील भड यांनी सांगितले.
डोळ्यांशी संबंधित आजार रेटिना शस्त्रक्रियेमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धत वापरली जाते. बुबुळापासून ठराविक अंतरावर तीन-चार चिरे मारून डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यासाठी टाके मारावे लागतात. टाके विरघळण्यास ४०-४५ दिवस लागतात. या कालावधीत डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
डॉक्टरांच्या बाजूने पाहिले, तर पारंपरिक टाके मारण्यासाठीसुद्धा कौशल्य, निपुणता लागते. कितीही मोठा सर्जन असला; तरी त्यालासुद्धा ३-४ टाके मारायला ८ ते १२ मिनिटांचा कालावधी लागतो. या संशोधित उपकरणामुळे नवीन सर्जनसुद्धा गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सहज करू शकेल व त्यांचा वेळही वाचणार आहे.
ऑटोमॅटिक यंत्रामुळे रेटिनाची शस्त्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर डोळ्यात देण्यात येणारे टाके आता डोळ्यांच्या बाहेर उघडे राहणार नाहीत. त्यामुळे रुग्णाला डोळा लाल होणे, पाणी येणे, रक्तस्राव होणे, टाक्याच्या जागी गाठ होणे. जंतू संसर्ग होणे आदी त्रास होणार नाही. दुरुस्त होण्यासाठी रुग्णाला ४५ दिवस वाट पाहावी लागणार नाही व रुग्ण तीन ते चार दिवसांत टाक्यांपासून मुक्त होईल.- डॉ. सुनील भड, नेत्रतज्ज्ञ, यवतमाळ
(Automatic device facilitates retinal surgery Yavatmal news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.