Bear fights tiger to save cub video goes viral on social media Incidents in Tadoba Tiger Reserve sakal
विदर्भ

Viral Video | पिलाला वाचविण्यासाठी अस्वल भिडले वाघाशी,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील घटना

वाघाने सावजावर पाळत ठेवली, तर त्याची शिकार ठरलेली असते. त्यापासून त्या सावजाला कुणीही वाचवू शकत नाही. मात्र, एखाद्या पोटच्या गोळ्याला वाघाने शिकारीसाठी भक्ष्य केल्याचे समजताच त्याच्या आईने दोन हात करीत वाघाला माघारी घालविले.

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : वाघाने सावजावर पाळत ठेवली, तर त्याची शिकार ठरलेली असते. त्यापासून त्या सावजाला कुणीही वाचवू शकत नाही. मात्र, एखाद्या पोटच्या गोळ्याला वाघाने शिकारीसाठी भक्ष्य केल्याचे समजताच त्याच्या आईने दोन हात करीत वाघाला माघारी घालविले.

ही घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एखादी आई आपल्या मुलाप्रती किती आक्रमक भूमिका घेऊ शकते, हे यातून सिद्ध झाले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध आहे. येथील वाघोबाने देश, विदेशातील पर्यटकांना भूरळ घातली आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथील वाघोबाला बघण्यासाठी गर्दी करीत असतात. पर्यटकांना कधी दर्शन देणाऱ्या, तर कधी हुलकावणी लावणाऱ्या वन्यप्राणी जंगलात मुक्तपणे संचार करीत असतात.

वन्यप्राणी मौजमस्ती करतानाचे व्हिडिओ नेहमीच बघायला मिळतात. मात्र, एक अस्वल मादी आपल्या पिलाला वाचविण्यासाठी वाघाशी झुंज दिल्याची घटना घडली. ही घटना खडसंगी बफर क्षेत्रातील असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT