police sakal
विदर्भ

भंडारा : दोन पोलिस निलंबित; एकाची बदली

आरोपींची कोठडी शुक्रवारपर्यंत वाढली

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : जिल्ह्यातील सावरटोली येथे झालेल्या महिला सामूहिक अत्याचार प्रकरणात बेजबाबदारपणा दाखवून कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी पोलिस उपनिरीक्षक दिलीपकुमार घरडे आणि साहायक उपनिरीक्षक लखन उईके या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच महिला पोलिस कर्मचारी खोब्रागडे यांची मुख्यालयात बदली केली आहे. या प्रकरणात सध्या दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान अटकेत असलेल्या दोन आरोपींची कोठडी आज न्यायालयाने वाढवली.

आरोपीने ३० व ३१ जुलै रोजी पीडितेवर अत्याचार केला व नतर तिला लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोडून दिले. ती उड्डाणपुलाजवळ बसली असताना महिला पोलिस पाटील यांनी तिला लाखनी पोलिस ठाण्यात पाठविले. तेथे महिला कर्मचाऱ्यांनी पीडितेची विचारपूस केली. परंतु, ती काहीही बोलली नाही, तसेच स्वत:चे नावही तिने सांगितले नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला महिला कक्षात ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडिता कुणालाही काहीही न सांगता पोलिस ठाण्यातील महिला कक्षातून निघून गेली.

नंतर पीडिता एक ऑगस्टला पुन्हा सामूहिक अत्याचाराला बळी पडली. सध्या पीडितेवर नागपुरातील मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचार सुरू आहे. सध्या पीडितेची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेला पोलिस ठाण्यात ठेवण्याऐवजी उपलब्ध असलेल्या महिला मदत केंद्रात पाठवायला हवे होते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. सध्या उपविभागीय अधिकारी पाटील लाखनी पोलिस ठाण्यात चौकशी करत आहेत.

आरोपींना १२ पर्यंत कोठडी

गोंदिया : भंडारा सामूहिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आरोपींना न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित महिला ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असल्यामुळे भंडारा पोलिसांनी हे प्रकरण गोरेगाव पोलिसांकडे वर्ग केले होते. अटकेतील दोन आरोपींना ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलिस कोठडीची तारीख संपल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत १२ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, तिसरा आरोपी अजूनही फरार आहे.

इतर प्रकरणांचीही दखल

राज्य महिला आयोगाकडून वर्षभरात १४३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर २०२० मध्ये ४६२ प्रकरणे निकाली निघाली आहेत. नागपुरात मांत्रिकाच्या सांगण्यावरून आईवडिलांनी आपल्या मुलीची हत्या केली. या प्रकरणाचाही दखल आयोगाने घेतली आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील १३ वर्षाच्या मुलीवर आश्रमशाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केला. संबंधित सरकारी रुग्णालयाने असे काही घडलेच नाही, असा खोटा अहवाल सादर केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचीही गंभीर दखल घेण्यात आली.

जलदगती न्यायालयासाठी प्रयत्न

या प्रकरणी येत्या पंधरा दिवसांत आरोपपत्र दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज नागपुरात दिली. चाकणकर यांनी सोमवारी मेडिकलला जाऊन पीडितेची चौकशी केली. पीडितेवर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत, असे चाकणकर म्हणाल्या. चाकणकर यांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा केली. उपचारात कुठलीही हयगय होऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT