Bhandara hsc exam results 2022 Student commits suicide due to Low marks sakal
विदर्भ

भंडारा : अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

बुधवारी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर

अभय भुते

लाखनी (जि. भंडारा) : बुधवारी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर होताच अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. लाखनी येथील समर्थ महाविद्यालय नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण करणारी मयुरी किशोर वंजारी (१७) रा. तलाव वॉर्ड, लाखनी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारला दुपारी बारावीचा निकाल घोषित झाला. आणि काही वेळातच ही अनपेक्षित घटना घडली. मयुरीला एक मोठी व लहान भाऊ आई,वडील असा परिवार आहे.

काल घोषित झालेल्या निकालात तिला अपेक्षित गुण मिळाले नाही. त्यामुळे ती नैराश्येत पोहचली. निकाल बघून घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला सुरक्षित ठेवण्याच्या पावडर ची पुडी झाल्याचे उघड उघड होताच कुटुंबीयांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अवाक्या बाहेर समजताच पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान तिचा भंडारा येथे मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लाखनीचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे हे घटनास्थळी पोहचले तशेच यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, श्याम पंचवटे, प्रा. धनंजय गिरहेपुंजे, प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी सदर मुलीच्या घरी जावून आई वडिलांचे सांत्वन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT