गडचिरोली : बर्ड फ्ल्यू आजार पक्ष्यांपासून थेट माणसांत होण्याची शक्यता खूपच कमी असून त्या विषयी भीती नको पण काळजी घ्यावी, अशा आशयाच्या सूचना गडचिरोली जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये फुले वॉर्डातील काही कोंबड्यांमध्ये मरतुक आढळून आली व त्यांचे नमुणे बर्ड फ्ल्यू तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल होकारार्थी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील फुले वॉर्डपासून 10 किमी त्रिज्येतील परीसर सतर्कता भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोषित केला आहे.
क्षेत्रामधून कुक्कुट पक्ष्यांची ने-आण, बाजार, व जत्रा / प्रदर्शन आयोजित करणे या बाबत पुढील आदेशाप्रर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बर्ड फ्ल्यू रोगाबद्दल कोणतीही भीती न बाळगता दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या परिसरात पक्ष्यांची असाधारण मरतुक आढळल्यास नजीकच्या पशुसंवर्धन विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
शिजवलेली अंडी व चिकन मांस पूर्ण सुरक्षित असून पूर्ण 30 मिनिटे शिजवलेले अंडी व चिकन मांस खाणे पूर्णत: सुरक्षित आहे. कच्चे चिकन मांस व कच्ची अंडी खाऊ नये. चिकन विकत घेताना विक्रेत्याकडील पक्षी संथ, आजारी नाहीत याची खात्री करा. आपल्या परिसरात कावळा, बगळा, कबुतर आदी पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास त्याला स्वत: हात लावू नका, ग्रामपंचायत किंवा मनपाला कळवा. बर्ड फ्ल्यू आजार पक्ष्यांपासून थेट माणसांत होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
परिसरातील कुक्कुटपालनामध्ये आपल्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांचा स्थलांतरित पक्ष्यांशी संपर्क टाळावा, पक्ष्यांच्या पाण्याची व खाद्याची भांडी दररोज स्वच्छ धुणे आवश्यक आहे, कुक्कुट पक्ष्यांच्या खुराड्यात स्वच्छता ठेवा, आपल्या पक्ष्यांना नियमितपणे लसीकरण करून घ्यावे, आपल्याकडील पक्षी आजारी पडल्यास किंवा मरतुक झाल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास द्यावी, आपल्या कुक्कुट पक्ष्यांची विष्ठा व नाकातील स्राव यांसोबत संपर्क येऊ देऊ नये, पक्ष्यांना शक्यतो हाताळू नये, हाताळल्यास हात साबणाने स्वच्छ धुवावे, आपल्या पक्ष्यांचे पाणी व खाद्य घराबाहेर उघड्यावर ठेऊ नये आदी सूचना दिल्या आहेत.
विक्रत्यांनी घ्यायची काळजी चिकन विक्रत्यांनी मांस, हॅंड ग्लव्हज आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, दुकानातील पक्षी ठेवण्याच्या खुराड्याची नियमित साफसफाई ठेवावी, दुकानाचा परिसर सॅनिटायझरने फवारणी करून निर्जंतुक करावा, परिसरातील उडलेले पक्ष्यांचे पंख फ्लेम गनने जाळून घ्यावे, फार्मवरून आजारी पक्षी आणणे टाळावे, वेस्ट मटेरियल प्लॅस्टिक बॅगमध्ये बंदिस्त करून पुरून टाका, दुकान बंद करताना सर्व उपकरणे स्वच्छ करण्याची तसेच दुकानाचे निर्जंतुकीकरण करण्याची दक्षता घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.