सिरोंचा (गडचिरोली) : कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यात महाराष्ट्राचे तीनचाकी सरकार अपयशी ठरत आहे. भांबावलेले सरकार कसलेही उफराटे निर्णय घेत आहे. अजूनही मुख्यमंत्रिपदाच महत्त्व आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहीत झालेली नाही. इतर कामासाठी आपापसात भांडणाऱ्या मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, अशी घणाघाती टीका भाजपच्या मोठ्या नेत्यानी केली आहे.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. 31) महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सिरोंचातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात सपत्नीक जाऊन दर्शन घेतले. यावेळी तेलंगणाच्या भाजप पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार पट्टा मधू यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले. सुधीर मुनगंटीवार यांनी नंतर सिरोंचाला भेट देऊन भाजप पदाधिकाऱ्यांशी पक्ष संघटन व परिसरातील नागरिकांच्या समस्यांवर चर्चा केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातली मंदिरे सुरू करण्याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. परंतु, त्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना मंदिराऐवजी मदिरेचा विषय जास्त आवडत असल्याचे दिसून येत, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजूनही मुख्यमंत्रिपदाचे महत्त्व आणि जबाबदारी पूर्ण माहीत झाली नाही. ‘तीन चाकी' सरकार आपापसात भांडत असल्याने प्रशासनावरची पकड सुटत आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्रात नवी भूमिका वठवण्याचा ‘सामना़' दैनिकातून देण्यात आलेल्या सल्ल्यावर मुनगंटीवार म्हणाले, अजूनही मुख्यमंत्रिपदाच महत्त्व आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना पूर्ण माहीत झाली नाही. त्यात असा सल्ला देणे, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना दिल्लीला पाठवून आतमधल्या कुणाची तरी त्या पदावर नजर आहे. यात काही तरी गडबड असल्याचा संशयही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. इतर कामासाठी आपापसात भांडणाऱ्या मंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
काही राज्यांनी मंदिरे सुरू केली आहेत. मात्र, राज्यात मंदिराऐवजी दारू दुकाने सुरू झाली आहेत. राज्य सरकारला लॉकडाउनच्या काळात मंदिराऐवजी दारू दुकाने सुरू करायची गरज वाटली. दारूच्या दुकानात कोरोना येत नाही, असे राज्य सरकारला वाटत असावे. हे सरकारच नव सायन्स असाव, अशी उपरोधक टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
राज्यात मंदिरे बंद करून मदिरालये सुरू ठेवणे हे कसले धोरण आहे, असा प्रश्न विचारत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.