Mala sakal
विदर्भ

MPSC Exam : शंकरबाबांच्या लेकीचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

वझ्झरच्या पद्मश्री पापळकर यांनी दिव्यांगांच्या पुनर्वसन क्षेत्रात घडविला इतिहास

सकाळ वृत्तसेवा

परतवाडा - रेल्वेस्टेशनवर बेवारस आढळून आलेल्या व दृष्टिहीन कु. मालाने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित केल्याने वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. दिव्यांगांच्या पुनर्वसन क्षेत्रात ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.

२० वर्षांपूर्वी माला ही दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असलेली मुलगी जळगाव येथे पोलिसांना रेल्वेस्टेशन येथे बेवारस स्थितीत सापडली. पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा, नातेवाइकांचा शोध घेतला. परंतु शोध न लागल्यामुळे तिला जळगाव येथील रिमांड होम मध्ये दाखल केले.

तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशान्वये पोलिसांनी वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात तिला दिले. बाबांनी तिला आपले नाव दिले.

त्या आधारावर तिचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून तिचे शिक्षण परतवाडा येथील यशवंत अंध विद्यालयात मध्ये चौथ्या वर्गापर्यंत झाले. परतवाड्याच्या आय. एस. गर्ल्स हायस्कूल येथून बारावीची परीक्षा तिने प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली. पुढील उच्चशिक्षणाकरिता तिला अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्रवेश दिला.

पदवीधर आणि पदव्युत्तर या दोन्ही शिक्षणाकरिता दर्यापूरचे प्रा. प्रकाश टोपले पाटील यांनी तिचे पालकत्व स्वीकारून तिची संपूर्ण व्यवस्था केली. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठामधुन पदवी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मध्ये २०१८ मध्ये पास होऊन तिने इतिहास घडविला. त्या नंतर मालाच्या पुढील पुनर्वसनाचे काय? हा गंभीर प्रश्न सतत बाबांना भेडसावत होता.

दैवयोगाने अमरावती येथील युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी स्वत:हुन बाबांकडे जाऊन मालाच्या एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीची जबाबदारी स्वीकारली. सुरवातीला तिला यश मिळाले नाही. नंतर तिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक (टंकलेखक) ही परीक्षा दिली. १६ मे रोजी सायंकाळी ऑनलाइन निकाल जाहीर झाला.

त्या मध्ये ती उत्तीर्ण झाली आणि तिची नेमणूक ही सचिवालय येथे होईल अशी माहिती आहे. महाराष्ट्र नव्हेतर संपूर्ण भारताच्या दिव्यांगाच्या पुनर्वसनाच्या इतीहासामधील ही एकमेव घटना सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाईल. कारण कु. माला ही बेवारस, अनाथ, दिव्यांग असून आपले जीवन बालगृहामध्ये घडवून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली आहे. दिव्यांगही आपल्या मेहनतीने आपल्या पायावर उभे राहून दिव्यांगांना प्रेरणा देवू शकतात हे सिद्ध होते. मी एवढ्यावर न थांबता आयएएसच्या परीक्षा देण्याचा प्रयत्न करेल, असे तिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT