e9408365-90d6-4b77-81d9-31f4e2dc8ce3.jpg 
विदर्भ

मंडळ कृषी अधिकारी मुख्यालयी सापडेना

सकाळ वृत्तसेवा

पिंजर (जि. अकोला) : गेली अनेक दिवसापासून मंडळ कृषी अधिकारी आपल्या कार्यलय व पिंजर सर्कलमध्येही दिसेनासे झाले आहेत. सर्कलमधील कुठल्याही शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांची ओळख नाही. कुठल्याही शासकीय योजनेची माहिती किंवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने मंडळ कृषी अधिकाऱ्यांची बदलीची मागणी सर्कलमधील शेतकरी करीत आहेत.


हे वाचा - आरटीई; शाळांना मिळाली संधी
योजनेपासून शेतकरी वंचित

महादेवराव राऊत हे सर्कलमधील मंडळ कृषी अधिकारी आहेत. त्यांच्या अंतर्गत एकूण ६५ खेडी येत असून, त्यांच्या अखत्यारीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्यासह सात-आठ कर्मचारी कार्यरत आहेत. हेच कर्मचारी दिवसभर शेतकऱ्यांना सहकार्य करताना दिसत असता. परंतु, पिंजर मंडळ कृषी अधिकारी आपल्या कार्यालयात कधीच सापडत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेची माहिती व लाभ देण्याचे कार्य करीत आहेत. परंतु, काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र नाहक त्रास आणि काहीतरी अडचन निर्माण करण्याचे कार्य मंडळ कृषी अधिकारी करीत असल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कृषी विभागाच्या अनेक योजनेपासून वंचित आहेत.

क्लिक करा - अकोला महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सभापती कोण होणार?
बदलिची केली मागणी

गेली काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांना बियाणाचे परमीट मिळाले नव्हते. परंतु, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागला. वास्तविक पाहता मंडळ कृषी अधिकारी यांनी स्वतः कार्यालयात हजर राहून, परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क करून त्यांच्या समस्याचे निवारण करणे, त्यांना शासकीय योजनेची माहिती देणे, पिकावरील येणाऱ्या रोगावरील उपाययोजनेची योग्य माहिती देणे, बी-बियाण्यांची माहिती देणे अशा प्रकारच्या अनेक विषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याची आवश्‍यकता असते. परंतु, या सर्कलमधील शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा कुठलाच फायदा होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची हिरमोड होत आहे. राऊत यांच्या मोबाईलवर संपर्क केला असल्यास ते आपला मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे देतात. त्यामुळे देखील शेतकऱ्यांचे त्यांच्याशी बोलणे होत नाही. जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वेळेवरच अशा मंडळ कृषी अधिकाऱ्यांची लवकरात-लवकर बदली करण्याची मागणी सर्कलमधील शेतकरी करीत आहेत.


गरज पडल्यास मी भेट देतो
सर्कलमधील गावांत कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक जात असतात. ते नेहमी शेतकऱ्यांना विविध योजनची माहिती शेतकऱ्यांना देत असतात. गरज असल्यास किंवा तपासणीच्या वेळी मी पण भेट देत असतो. नोबाईलवरही मी स्वतः बोलत असतो.
-महादेवराव राऊत, मंडळ कृषी अधिकारी, पिंजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT