Body carried away by water during funeral 
विदर्भ

नदीपात्रात सुरू होते अंत्यसंस्कार, अचानक आला पाण्याचा लोंढा आणि...

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : निर्गुडा नदीच्या काठावर असलेल्या पळसोनी गावातील 57 वर्षीय व्यक्‍तीचा अपघाती मृत्यू झाला. प्रथेनुसार नदीपात्रालगत अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. जिल्ह्यात पाऊस बरसला, परंतु दमदार नसल्याने पाणी जमिनीतच मुरले. त्यामुळे नदी प्रवाहित झाली नव्हती. त्यामुळे पात्रातच सरण रचण्यात आले. सायंकाळची वेळ असल्याने साऱ्यांची लगबग सुरू होती. सरण रचले, मृतदेह चितेवर ठेवला पुन्हा काही लाकडे ठेवली. विधी पार पडले आणि कुठूनतरी पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि होत्याचे नव्हेत झाले.

सीताराम बापूराव बेलेकर असे मृताचे नाव आहे. ते पळसोनी येथील रहिवासी असून, कुंभारखणी कोळसा खाणीत कार्यरत आहेत. सोमवार 15 जूनला सकाळी 9 वाजताच्या सुमारास आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केल्यावर प्रेत परिवाराच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली.

पळसोनी गाव निर्गुडा नदीच्या तीरावर वसले आहे. तसेच ग्रामीण भागात नदीच्या काठावरच अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे. सध्या परिसरात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने परिसरातील नदी नाले कोरडे आहेत. विदर्भात शुक्रवारी मॉन्सून दाखल झाला खरा, परंतु प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाली तरी रविवारपासून. पहिला पाऊस जमिनीतच मुरल्याने नदी प्रवाहित होणार कशी? त्यामुळे निर्गुडा नदीचे पात्रदेखील कोरडे असल्याने नदीच्या पात्रात सरण रचण्यात आले आणि प्रथेनुसार अग्नी देण्यात आला. अंत्यसंस्कारनंतर बाकीचे विधी सुरूच होते तोच अचानक नदीच्या पात्रात पाणी वाढू लागले. पाहता पाहता निर्गुडेचा प्रवाह चांगलाच गतिमान झाला, ग्रामस्थ मागे मागे सरकत गेले. काही कळायच्या आत नदीचे पात्र भरून वाहू लागले. आता काय होणार, हाच प्रश्‍न तेथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात होता.

पूर आल्याने चिता तर विझलीच, पण लाकडेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहायला लागली. काही जणांनी प्रसंगावधान राखत प्रेताला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु वाढत असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे सरणातील लाकडासोबत प्रेतही वाहत गेले. हा प्रकार घडताच साऱ्यांचीच धावपळ सुरू झाली. अर्धवट जळालेल्या प्रेताचा शोध साऱ्यांकडून घेण्यात येत आहे. मात्र, 24 तास लोटूनही प्रेत नदी पात्रात सापडले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, नदीला एवढे पाणी आले कुठून अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

SCROLL FOR NEXT