नागपूर : कोरोनाची भीती अजूनही डोक्यात असतानाच गेल्या आठ महिन्यांच्या टाळेबंदीचा तणाव घालविण्यासाठी पर्यटकांनी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये जंगल भ्रमंतीला पसंती दिली आहे. त्यामुळेच ताडोबा- अंधारी, पेंच, मध्यप्रदेशातील पेंच, पन्ना आणि बांधवगड या व्याघ्र प्रकल्पाला निसर्ग प्रेमींच्या उड्या पडत असल्याने तीन जानेवारीपर्यंत हाऊसफुल्ल आहेत. पेंच व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पहिली पसंती मिळत आहेत.
हेही वाचा - गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अवकाळीच्या सावटात; ढगाळ वातावरणामुळे कडधान्यवर्गीय पिकं धोक्यात
विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प वाघांच्या हमखास दर्शनासाठी नावारूपास आल्याने पर्यटकांचा ओघ वाढला. कोरोनामुळे तब्बल आठ महिने तीन घरात बंदिस्त असलेल्या महिने बंद असलेला पर्यटकांनी निवांतपणा मिळावा म्हणून ताडोबा आणि पेंचला निसर्ग प्रेमींचा कल वाढला आहे. मोहर्ली, कोलारा, फुंटवंडा, कोळसा आणि नवेगाव प्रवेशद्वारावरील बुकिंग हाउसफुल्ल झाले आहे. तसेच बफर क्षेत्रातही वाघाचे दर्शन नियमित होत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या उड्या येथील देवाडा, अगरझरी, जुनोना, मदनापूर, अलिझंजा, नवेगाव रामदेगी, चिचखेडा आणि निमदेला येथील बुकिंग जोमात सुरू आहे.
जगभरात वाघांची घटणारी संख्या ही चिंतेचा विषय झाला आहे. वाघांची संख्या वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाघांची संख्या वाढताना दिसत आहे. ताडोबा राज्यातील वाघाचे मोठे आश्रयस्थान आहे. पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा ही पहिले पसंतीचे केंद्र असल्याने देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही येथे येतात. कारण या व्याघ्रप्रकल्पात वाघासोबतच इतर वन्यप्राणी पर्यटकांना हमखास होते. यामुळेच पर्यटकांचा ओढा वाढत असल्याने व्याघप्रकल्प हाऊसफुल्ल होऊ लागले आहे. वनविभागाच्या ऑनलाइन बुकिंगवर पर्यटकांचा उड्या पडत आहे.
वन विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचेसुद्धा रिसोर्ट येथे आहेत. त्याचे बुकिंग सुद्धा ऑनलाईन आहे. ताडोबा प्रशासनाने नव्याने सुरू केलेल्या वेबसाईटलाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद आहे. यामुळे पर्यटकांचा फायदा झालेला आहे. या आरक्षण पद्धतीमुळे देशविदेशांतील पर्यटकांना आता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन आरक्षण घरी बसून सुध्दा करता येत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून केवळ ८० टक्के आरक्षण दिले जात असून काही आरक्षण संबंधित प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशव्दारावर पहिले येणाऱ्या पर्यटकांना दिले जाणार आहे. तर अतिरिक्त शुल्क आकारून बुकिंग करण्यात येते.
पेंच व्याघ्र प्रकल्पातही नियमित वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहेत. त्या सिल्लारी आणि खुर्सापार प्रवेशद्वारावरील बुकिंग हाऊसफुल्ल झालेली आहे. टिपेश्वर अभयारण्यातही वाघाचे दर्शन होत असल्याने येथील बुकिंगही जोमात आहे. उमरेड-कऱ्हांडला, मानसिंगदेव अभयारण्यातील प्रवेशद्वारावरील ५० टक्के बुकिंग झालेले आहे. नवेगाव-नागझिरा, बोर व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघाचे दर्शन होत नसल्याने येथील बुकिंग सुमार आहे.
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे हमखास दर्शन होऊ लागल्याने सर्वच व्याघ्र प्रेमींच्या उड्या पडू लागल्या आहेत. पर्यटन वाढल्याने सलग चार महिन्यापासून बेरोजगार झालेले गाईड, हॉटेल संचालक आणि जिप्सी चालकांच्या चेहऱ्यावर हस्स फुलले आहे. पर्यटन वाढत असले तरी पर्यटकांनी नियमाचे पालन करुनच निसर्गाचा आनंद घ्यावा.
-विनीत अरोरा, वन्यजीव अभ्यासक.
अशी करा बुकींग -
ताडोबाची बुकींग करताना https://mytadoba.org/ या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन बुकींग करता येईल. याचप्रमाणे पेंच (http://www.mahaecotourism.gov.in/Site/Common/nationalParks.aspx) बांधवगड, पन्न या व्याघ्र प्रकल्पास भेट द्यायची असेल तर ऑनलाइन बुकींग करता येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.