डोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांच्याविरोधात दिवसेंदिवस रोष वाढत असून, डोणगावमध्ये सीसीटीव्हीतील प्रकाराबाबत त्यांचा जाहीर फलकातून निषेध करण्यात येत आहे. तर, साजन शहा यांनी प्रशासनाकडे त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी करत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात, डोणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे यांनी सरपंच, सरपंच पती व ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप परमाळे, गणेश घोगल यांच्यासमक्ष भ्रष्टाचार कसा करायचा, बेकायदेशीररीत्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा करायचा, ग्रामपंचायतीमध्ये आपल्या हिश्याच्या रकमेचा अपहरण कोणत्या पद्धतीने करायचा, मतदारांबाबत अपशब्द संबोधून एक प्रकारे मत हे दान करण्याचा पवित्र कृतीला कलंकित केले आहे. ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांनी मतदारांचा अपमान केला आहे.
ग्रामपंचायतीमधील कर्मचारी प्रदीप परमाळे, गणेश घोगल सरपंच यांनी सुद्धा या कृतीला पाठीशी घालून त्यांचे समर्थन केले आहे की काय? म्हणूनच आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याबाबत त्यांचे स्तरातून कोणतेही प्रयत्न केले नाही. म्हणूनच हे सुद्धा झालेल्या भ्रष्टाचाराच्या घटनेत समाविष्ट असल्याची शंका ही नाकारता येत नाही. यांच्यावर सुद्धा प्रशासकीय स्तरावरून कडक कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच सचिव ज्ञानेश्वर चनखोरे यांनी डोणगाव ग्रामपंचायतीचा कारभार आपल्या हाती घेतल्यापासून तर आज पर्यंत आलेल्या ग्रामपंचायत मधील निधी ग्रामपंचायतीला मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमा विविध मार्गातून जमा होणारी रक्कम यामधून काढलेले रकमा विकासाच्या नावाखाली केलेल्या योजनेमध्ये केलेला खर्च खर्चाची खातेनिहाय वैयक्तिक कायदेशीर समिती गठित करून चौकशी करा व त्यात सचिव ज्ञानेश्वर चनखोरे त्यांच्यावर निलंबन अपहाराची रक्कम वसूल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा नागरिक म्हणून आत्मदहन करावे असा इशारा साजन शहा दिला आहे.
जाहीर बॅनरमुळे खळबळ
डोणगाव व गावाचा फार मोठा अपमान झालेला आहे. याचा जाहीर निषेध बॅनरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामविकास अधिकार्यास त्वरित निलंबित करावी ही जाहीर मागणी करत भ्रष्टाचारात पाठीशी घालणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध अशा आशयाचे बॅनर डोणगावात ठिकठिकाणी लावले आहेत. सदर बॅनर कुणी लावले याबाबत मात्र उल्लेख नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.