Buldana esakal
विदर्भ

Buldana : महसुली मंडळाला मिळणार दुष्काळसदृश सवलती

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचे आदेश ः शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील बुलडाणा व लोणार तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार १० नोव्हेंबर २०२३ नुसार बुलडाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ७३ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. दुष्काळ घोषित झालेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसह विद्यार्थी व नागरिकांना दुष्काळसदृश्य सवलती मिळणार आहेत.

खरीप हंगाम जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकाच्या स्थितीचा एकत्रित विचार करून जिल्ह्यातील ७३ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलडाणा आणि लोणार तालुक्यातील १९ गावांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

बुलडाणा व लोणार तालुक्यातील १९ गावांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे. चिखली तालुक्यातील अमडापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा, खु. धोडप, पेठ, शेलगाव आटोळ, चांदई, चिखली, हातणी. दे. राजा तालुक्यातील देऊळगाव राजा, दे.मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा, मेहकर तालुक्यातील मेहकर, जानेफळ, हिवराआश्रम, डोणगाव, दे. माळी, वरवंड, लोणी गवळी, अंजनी बु. नायगाव दत्तापूर, सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सोनोशी, शेंदुरजन, साखरखेर्डाचा समावेश आहे.

मलकापूर तालुक्यातील जांभुळ धाबा, दाताळा, धरणगाव, मोताळा तालुक्यातील मोताळा, बोराखेडी, धामणगाव बढे, पिंप्री गवळी, रोहिणखेड, पिंपळगाव देवी, शेलापूर बु., नांदुरा तालुक्यातील नांदुरा, वडनेर, शेंबा, निमगाव, चांदुरबिस्वा, महाळुंगी, खामगाव तालुक्यातील खामगाव, पिंपळगाव राजा, लाखनवाडा, हिवरखेड, काळेगाव, आवार, अटाळी, पळशी बु. आडगाव, वझर, पारखेड तसेच शेगाव तालुक्यातील माटरगाव, जलंब, जवळा बु.,मानसगाव, जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, पिंपळगाव काळे, वडशिंगी, आसलगाव, जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर, पातुर्डा आणि कवठळ या गावांचा दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये समावेश आहे.

अशा मिळतील सवलती

जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देणे, कृषी पंपांच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT