Buldana Lok Sabha 2024: बुलढाणा मतदारसंघात जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहेकर, खामगाव व जळगाव जामोद या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यापैकी बुलढाणा आणि मेहकर मतदारसंघात शिवसेनेचे, खामगाव, जळगाव जामोद व चिखलीमध्ये भाजपचे, तर सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. लोकसभा मतदारसंघावर गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा ताबा आहे. मात्र आता बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये काय होते ते पाहावे लागणार आहे. जिल्ह्यातील मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रतापराव जाधव (शिवसेना) विजयी मते : ५,२१,९७७
डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ३,८८,६९०
बळीराम शिरसकर (वंचित बहुजन आघाडी) मते : १,७२,६२७
नोटा मते : ७,६८१
विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,३३,२८७
२००४ : शिवसेना
२००९ : शिवसेना
२०१४ : शिवसेना
२०१९ : शिवसेना
महायुती किंवा महाविकास आघाडीने अद्यापही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांचा प्रचार सुरू; मात्र पक्ष निश्चित नाही.
वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेवर बुलढाणा मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून असणार.
खामगाव जालना रेल्वे मार्ग
खारपानपट्ट्यामुळे होणारे आजार
लोणार सरोवर संवर्धन आराखडा.
सिंदखेडराजा जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखडा.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या मुलांना शहराचा औद्योगिक विकास.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.