विदर्भ

Buldhana Accident : सिमेंटचे खांब घेऊन जाताना काळाचा घाला! ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली; दोन मजूर ठार,तिघे गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

मोताळा : सिमेंटचे विद्युत खांब घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने दोन मजूर ठार तर, तिघे जण जखमी झाल्याची घटना बोराखेडी ते वडगाव मार्गावर आज २२ सप्टेंबरला दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. मंगेश ज्ञानदेव सातव (२९) व रामदास पुंजाजी बेलोकार (४२, दोघे रा. वाडी ता. नांदुरा) अशी मृतकांची नावे आहेत.

काही मजूर एका ट्रॅक्टर- ट्रॉलीमध्ये सिमेंटचे विद्युत खांब घेऊन बोराखेडी ते वडगाव मार्गाने जात होते. यामध्ये पाच ते सहा मजूर देखील बसलेले होते. दरम्यान, पुन्हई फाट्यानजीकच्या वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली अनियंत्रित होऊन उलटली.

यावेळी सिमेंटचे खांब मजुरांच्या अंगावर पडले. त्यामुळे मंगेश ज्ञानदेव सातव (२९), रामदास पुंजाजी बेलोकार (४४), संतोष बेलोकार (३५), हरीश बेलोकार (२३), शुभम खंडारे (२२, सर्व रा. वाडी ता. नांदुरा) हे पाच जण गंभीर जखमी झाले. यावेळी परिसरातील नागरिकांनी जखमींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने उपचारासाठी मोताळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी आपत्कालीन रुग्णवाहिकेद्वारे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु मंगेश ज्ञानदेव सातव व रामदास पुंजाजी बेलोकार या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तिघा जखमींवर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृत्त लिहेपर्यंत याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दाखल झाली नव्हती.

जखमी शुभम हा अग्निवीरची परीक्षा पास

अपघातातील जखमी शुभम खंडारे हा युवक अग्निवीरची परीक्षा पास असल्याची माहिती मिळाली आहे. त्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्याला काही जण कामावर जाण्यास मनाई करीत होते. परंतु कुटुंबाला हातभार लागावा म्हणून तो कामावर गेला होता. या अपघातात शुभम हा जखमी झाला आहे.

वाडी गावावर शोककळा

अपघातातील दोघे मृतक व तिघे जखमी एकाच गावातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे वाडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातातील सर्व जण मजूर वर्ग असून, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Health: उपोषणस्थळी भोवळ अन् रक्तदाबाचा त्रास, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

SCROLL FOR NEXT