Buldhana Bus Accident  Esakal
विदर्भ

Buldhana Bus Accident : 'काचेवर हात आपटत मदत मागत होते, मदत मिळेना अन् त्यात लहान बाळ बघता बघता...'

अंकिता खाणे (Ankita Khane)

बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातून आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.(Latest Marathi News)

बसमधील २५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आठ प्रवासी थोडक्यात बचावले. परंतु याच महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी या अपघात ग्रस्तांची वेळीच मदत केली असती, तर आणखीही जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काहींनी केला आहे. तर आपल्या डोळ्यांदेखतच एका बाळाचा जळून मृत्यू झाल्याचंही एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं आहे.(Latest Marathi News)

अपघातानंतर बसच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचांवर हात आपटून काही प्रवासी मदतीसाठी गयावया करत होते. पण आजूबाजूने जाणारे इतर वाहन चालक मदतीसाठी थांबले नाहीत, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.(Latest Marathi News)

आग लागल्यामुळे आतून प्रवाशांना काचा फोडणं शक्य झालं नाही. परंतु आजूबाजूने जाणारे ट्रक, टेम्पो आणि इतर चालक थांबले नाहीत, त्यांनी आपल्याकडील लोखंडी रॉडने काचा फोडण्यास मदत केली असती, तर मृतांचा आकडा कमी असता,असंही काहींनी म्हंटलं आहे. तर बसच्या मागील बाजूला एक महिला आपल्या बाळासह काचेवरती हात आपटत आपटत सुटकेची याचना करत होती, मात्र आमच्या डोळ्यांदेखतच त्यांचा जळून कोळसा झाला, असंही ते म्हणालेत.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याला 'बढती'; अर्शदीप सिंगची टॉप १० मध्ये एन्ट्री अन् वॉशिंग्टनलाही फायदा

National Award 2024 : वाळवी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारायला सिनेमाच्या टीमची अनुपस्थिती ; निर्माती म्हणाली...

Latest Maharashtra News Updates : मोदींच्या हस्ते नागपूर, शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाचं भूमिपूजन

PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानी बॉलरचा ‘पोपट’ झाला! चेंडू स्टम्पला लागला, Harry Brook तरीही नाबाद राहिला, Video

यिनच्या वतीने पुण्यातील विविध महाविद्यालयात वाहतूक व रस्ते सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन.

SCROLL FOR NEXT