buldhana hospitals esakal
विदर्भ

Buldhana News: धक्कादायक बातमी! महिलेच्या डोळ्यात साठ जिवंत आळ्या; विचित्र प्रकार बघून डॉक्टरही चक्रावले

संतोष कानडे

बुलढाणाः बुलढाण्यामध्ये एक चक्रावून सोडणारा प्रकार घडला आहे. एका महिलेच्या डोळ्यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल साठ जिवंत आळ्या आढळून आलेल्या आहेत. हे बघून डॉक्टरांनादेखील धक्का बसला.

बुलढाण्यातल्या चिखली येथे हा प्रकार घडला. येथील मोरवाल हॉस्पिलटच्या डॉक्टरांमुळे महिलेचा डोळा बचावला आहे. ही महिला चिखलीतल्या मालगणी येथील आहे. ज्योती गायकवाड असं महिलेचं नाव असून डॉक्टरांनी दीड तासांमध्ये तिच्या डोळ्यातून साठ आळ्या बाहेर काढल्या.

मोरवाल हॉस्पिलटलचे डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या गरीब महिलेकडून कुठलेही पैसे घेतले नाहीत. सदरली महिला मजुरी करुन पोट भरत असल्याची माहिती आहे. काम करताना दुखापत झाल्याने तिच्या डोळ्यामध्ये आळ्या झाल्या होत्या.

दीड ते दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा डोळा वाचला आहे. डॉक्टरांनी अत्यंत काळजीपर्वक महिलेच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केल्यामुळे महिलेची दृष्टी अबाधित राहिली आहे. त्यामुळे डॉक्टरांचं सर्वत्र कौतुक होतंय.

एक दोन नव्हे तर तब्बल साठ आळ्या डोळ्यामध्ये निघाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. पैशांअभावी अपचार न घेतलेल्या महिलेचा डोळा थोडक्यात बचावला आहे. रुग्णालयानेही माणुसकी दाखवत गरीब महिलेकडून पैसे घेतले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Explained: आदिवासी आमदारांकडे राज्याच्या सत्तेची चावी? भाजप अन् शिंदे गटासाठी व्होट बँक मोठे आव्हान!

Mobile Password Tips : मोबाईलचा पासवर्ड विसरला? चिंता कशाला; एका मिनिटांत होईल Recover,सोपी ट्रिक वापरुन बघाच

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन रिलेशनशिपमध्ये ; "लग्नाचा विचार आम्ही..." अभिनेत्याने दिली कबुली

Eknath Shinde: एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा गुवाहाटीला? नेमकं कारण काय?

ऑक्टोबरमध्ये कुठल्या झाडाला आंबे लागतात? 'लाडकी बहीण'वरून अमृता खानविलकर ट्रोल, नेटकरी म्हणाले- चंद्रा बाई..

SCROLL FOR NEXT