Buldhana Crop damage sakal
विदर्भ

Buldhana Crop Damage : केवळ ७३ गावे दुष्काळ सदृश! एक हजार ४२० गावांची अंतिम पीक पैसेवारी ६५ पैसे

Buldhana Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ७३ गावांची पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याने त्यांना दुष्काळ सदृश मानले गेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या जिल्ह्यातील एकूण १४२० गावांची अंतिम पीक पैसेवारी ६५ पैसे जाहीर झाली आहे..

१३४७ गावांची नजरअंदाज पीक पैसेवारी ५० पैसेचेवर तर केवळ ७३ गावांची नजरअंदाज पीक पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाली. त्यामुळे ही नजर अंदाजवारी याच ७३ गावांना सध्यातरी दुष्काळ सदृश मानत आहे.जिल्ह्यात जून महिन्यात पावसाला सुरवात झाली अन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतरही पावसामुळे नुकसानीने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही.

असे असताना शासनाकडून करण्यात येणारी नजर अंदाजवारी फक्त ७३ गावांमध्येच दुष्काळ असल्याचे दाखवत आहे. या पैसेवारीत फरक पडून दुष्काळग्रस्त गावांची संख्या वाढू शकते.अशा परिस्थितीत सुधारीत पैसेवारी कशी येते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. २०२४-२५ या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण १४२० गावांची अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाली आहे. जाहीर झालेल्या पीक पैसेवारीनुसार जिल्ह्यातील १४२० गावापैकी १३४७ गावांची नजर अंदाज पीक पैसेवारी ५० पैसेचेवर तर ७३ गावांची नजर अंदाज पीक पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे.

तालुकानिहाय अंतिम पीक पैसेवारी

बुलडाणातील ९८ गावांची अंतिम पीक पैसेवारी ७२, चिखली तालुकात १४४ गावांची पैसेवारी ७०, देऊळगाव राजा ६४ गावांची पैसेवारी ७२, मेहकर १६१ गावांची पैसेवारी ७२, लोणार ९१ गावांची पैसेवारी ६२, सिं. राजा ११४ गावांची पैसेवारी ६८, मलकापूर ७३ गावांची पैसेवारी ६७, मोताळा १२० गावांची पैसेवारी ६१, नांदुरा ११२ गावांची पैसेवारी ६५, खामगांव १४६ गावांची पैसेवारी ५३, जळगांव जामोद ११९ गावांची पैसेवारी ५५ पैसे आणि संग्रामपूर १०५ गावांची अंतिम पीक पैसेवारी ७३ आहे.

शेगाव तालुका दुष्काळाच्या छायेत

शेगावमधील ७३ गावांची ४७ पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्याची एकूण १४२० गावांची अंतिम पीक पैसेवारी ६५ पैसे जाहीर झाली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. त्यामुळे शेगाव तालुका दुष्काळाच्या छायेत असल्याचे पैसवारीतून स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT