Buldhana Loksabha Election 2024 sakal
विदर्भ

Buldhana Loksabha Election : तिरंगी लढतीमुळे सर्वांनाच विजयाची आस!

बुलडाणा मतदारसंघात रविकांत तुपकरांमुळे सामना रंगतदार

अरुण जैन

बुलडाणा - बुलडाणा लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारी मध्ये फारसा फरक पडला नसला तरी यावेळी लढत तिरंगी झाल्याने शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर व दमदार अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर या तिघांनाही निवडून येण्याची अपेक्षा आहे.

२०१४-२०१९ मध्ये मोदी लाट प्रभावी होती, मात्र २०२४ च्या निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कंबन्सी हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या दोन्ही वेळच्या निवडणुकांमध्ये सरळ लढत झाल्याने व लाटेचा फायदा मिळाल्याने खासदार प्रतापराव जाधव विजयी झाले होते, मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे.

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याने नेते व पदाधिकारी एका बाजूला व मतदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने, असे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, गेल्या निवडणुकीत असे असूनही जाधव यांना सुमारे दीड लाखांचे मताधिक्य मिळाले होते. अँटी इन्कम्बर्समुळे यामध्ये वजाबाकी झाली तरी थोड्याफार फरकाने का होईना आपला विजय निश्चित असल्याचे प्रतापराव जाधव समर्थक व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सहाही महायुतीचे आमदार यांना वाटत आहे.

अपक्ष शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून रविकांत तुपकर यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व गरीब जनता यांच्या भरवशावर श्री. तुपकर यांनी ही निवडणूक एक हाती लढली. विरोधात सहा आमदार एक खासदार, मोठमोठे पदाधिकारी असताना तुपकर यांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या आपली भूमिका मतदारांना पटवून देत मते मागितली होती.

अनेक कार्यकर्ते विरोधकांकडे दिसत असले तरी मनाने मात्र ते तुपकरांकडे होते हे निश्चित ! मात्र ही संख्या निश्चित नसल्याने इतर कोणीही काही सांगत नसले तरी तुपकर यांना मात्र विजयाचा विश्वास आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर व दुसरे अपक्ष उमेदवार वन बुलडाणा मिशनचे संदीप शेळके यांनाही सन्मानजनक मते मिळण्याची अपेक्षा आहे.

वंचितची मते वळली महाविकास आघाडीकडे

दुसरीकडे महाविकास आघाडीने नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली. खेडेकर यांचा स्वतःचा वैयक्तिक असा मोठा जनसंपर्क नसला तरी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेली सहानुभूती व ऐनवेळी एससी आणि मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला सोडून महाविकास आघाडीला दिलेली साथ यामुळे खेडेकरांच्या अपेक्षा निश्चितच उंचावल्या आहेत.

शिवाय या निवडणुकीत महायुतीचे प्रतापराव जाधव व अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले असताना खेडेकर मात्र दोन्ही उमेदवारांची सुरक्षित अंतर ठेवून व जपून बोलत होते.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील रोष

  • गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला खामगाव-जालना रेल्वे मार्ग

  • कागदावरच असलेला नदी जोड प्रकल्प

  • पंतप्रधान किंवा योगी आदित्यनाथ यांची सभा न होणे

  • सोयाबीनचा पडत्या भावामुळे शेतकऱ्यांमधील नाराजी

  • पीएम किसानचे अनेक शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे

  • उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल लोकांमध्ये आपुलकी

  • एससी, मुस्लिम मतदारांची आघाडीला साथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT