बुलडाणा : मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याच्या प्रकरणी शिवसेनेचे बुलडाण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अखेर बुलडाणा शहर पोलिसात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात आमदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे गुन्हे दाखल होत असतातच, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्यूंजय गायकवाड याचा वाढदिवस १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. मृत्यूंजय गायकवाड हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांचा वाढदिवस १५ ऑगस्ट रोजी शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकात साजरा केला. या कार्यक्रमात आमदार गायकवाड यांनी स्टेजवर मोठ्या तलवारीने वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर तो केक तलवारीनेच पत्नी व मुलाला भरवला होता. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या वाढदिवसाच्या सोहळ्यात मोठी गर्दी जमली होती.
अनेक गुन्हे दाखल होतात आणि खारिज होतात. राहिला विषय तलवारीचा... तर ही तलवार शेकडो आयाबहिणींच्या रक्षणासाठी कायम तळपत राहणार. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण समाजासाठी कायम कार्यरत राहणार आहोत.
- संजय गायकवाड,
आमदार बुलडाणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.