Buldhana Assembly Election Sakal
विदर्भ

Buldhana Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराच्या वाहनांची चाके थांबली

Buldhana Vidhan Sabha Election 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; आता बैठकी व गाठीभेटीवर भर, ११५ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जिल्ह्यात सातही मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीसाठी १२ दिवसांपासून चालू असलेली प्रचाराची रणधुमाळी १८ नोव्हेंबर रोजी सांयकाळी थांबली. प्रचारासाठी मिळलेल्या कालावधीत निवडणूक रिंगणात असलेल्या ११५ उमेदवारांमध्ये प्रचार करण्यासाठी जणू ओढ लागली होती. आता त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या वाहनांची चाके आता थांबली असून मुकप्रचार व गुप्त बैठकांद्वारे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार आता फिल्डींग लावत आहे.

सर्वच विधानसभा लढतीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले होत. सातही विधानसभा मतदारसंघात यंदा ११५ उमेदवार रिंगणात आहेत. आपला वचननामा घेऊन थेट मनदारांशी संवाद साधला गेला. १२ दिवस उमेदवारांनी प्रचार रॅली, सभांमधून मांडला. स्टार प्रचारकांच्या सभांनाही मोठी गर्दी झाली होती.

भाजप-शिवसेनेकडून आणि काँग्रेसकडूनही प्रचारादरम्यान आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, स्टार प्रचारकांनी सभेतून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. आता जिल्ह्यातील २१ लाख ३४ हजार ५०० उमेदवारांच्या हाती निवडणूक रिंगणातील ११५ उमेदवारांचे भवितव्य आहे. आता २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होईल.

चार ठिकाणी थेट लढत

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून बुलडाणा, चिखली, मलकापूर या ठिकाणी थेट लढतींचे संकेत आहेत. सिंदखेडराजांमध्ये महायुतीचे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही उमेदवार असून शरद पवार गटाच्या आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी तिरंगी लढत होत आहे. तर मेहकरात या निवडणुकीत शिंदे शिवसेना व महाविकास आघाडीतच्या उमेदरावरात दुरंगी लढत होणार आहे.

११५ उमेदवारांमध्ये लढत

मलकापूर विधानसभा मतदार संघात येथे ७, बुलडाणा येथे ८, चिखली येथे १८, सिंदखेड राजा येथे १८, मेहकर येथे ११, खामगांव येथे ४ व जळगांव जामोद येथे ६ असे एकूण ७२ उमेदवारांचे नामनिर्देशन उमेदवारी मागे घेतले. मलकापूर येथे १५, बुलडाणा येथे १३, चिखली येथे २४, सिंदखेड राजा येथे १७, मेहकर येथे १९, खामगांव येथे १८ व जळगांव जामोद येथे ९ असे एकूण ११५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघ मिळून असलेल्या २१ लाख ३४ हजार ५०० मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटप करावयाच्या मतदार चिठ्ठ्यांपैकी आतापार्यंत ९५ टक्के चिठ्ठयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र नेमके कोठे आहे याची माहिती मिळण्यास मदत झाली आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी ७६० वाहने

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान कर्मचारी व यंत्रसामग्रीची ने-आण करण्यासाठी ७६९ वाहनांची गरज भासणार आहे. त्याचे नियोजन निवडणूक विभागाने केले आहे. २२८८ मतदान केंद्रांसाठी २२० झोन बनविण्यात आले आहे. २६८ बसगाड्या, ५६ स्कूल बस, ३५९ जीप आणि १७ ट्रक या कामासाठी लागणार आहेत.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT