bull climbs to the third nest of the complex At Yavatmal 
विदर्भ

Video : मध्यरात्री वळू चढला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या माळ्यावर, दुसऱ्यादिवशी घडला हा प्रकार...

गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : येथील बसस्थानक परिसर... येथे मोठ-मोठे दुकाने आणि कॉम्प्लेक्‍स आहेत... बुधवारी रात्रीच्या सुमारास एक सांड (वळू) चक्‍क एका कॉम्प्लेक्‍सच्या तिसऱ्या माळ्यावर चढता... रात्रभर तिथे मुक्‍काम केला... दुसरा दिवस म्हणजे गुरुवार उजळला... मात्र, त्याला खाली येण्याच्या मार्ग काही सापडेना... त्याच्या मदतीसाठी नागरिक धाऊन गेले... परंतु, तो बिथरल्याने पुढील घटनाक्रम घटना... 

यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील बसस्थानक परिसरात राजेश कोठारी यांचे कॉम्प्लेक्‍स आहे. या कॉम्प्लेक्‍सवर मोबाईल नेटवर्कचे टॉवर आहे. रात्र झाल्यानंतर सर्व दुकानदार दुकान बंद करून घरी गेले. तसेच कॉम्प्लेक्‍समध्ये राहत असलेले नागरिक झोपी गेले. यानंतर रात्रीच्या सुमारास वळू (सांड) पायऱ्या चढत चक्क इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर चढला. रात्रभर तो तिथे थांबला. मात्र, खाली उतरण्याचा रस्ता त्याला सापडत नसल्याने अडकला. 

परंतु, गुरुवारी दुपारचे बारा वाजेपर्यंत तो कॉम्प्लेक्‍सच्या तिसऱ्या माळ्यावर अडकूनच होता. ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट वळू नागरिकांच्या अंगावर धाऊन येत होता. नागरिक त्याला हकलण्याच्या प्रयत्न करीत असल्यामुळे तो अधिकच बिथरला होता. हाकण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर फुस्कारे टाकत तो इकडे तिकडे धावू लागला. 

काहीही केल्या तो खाली उतरत नसल्याने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही त्याला हुसकवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, वळू काही केल्या उतरायला तयारच नव्हता. हतबल झालेल्या पोलिसांनी याची माहिती वनविभागाला दिली. यानंतर नमुद घटनास्थही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यावेळी पशु विभागाचे कर्मचारीही हजर झाले. मोठ्या प्रयत्नानंतर वळूला खाली उतरविण्यात पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.


एकत्रित प्रयत्नातून उतरवले खाली

नेर चौकात असलेल्या बसस्थापक परिसरात एक वळू कॉम्प्लेक्‍सच्या तिसऱ्या माळ्यावर चढल्याची बातमी समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. प्रत्येकजण वळूला हाकलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, कुणालाही यश मिळत नव्हते. मात्र, पोलिस व वनविभागाच्या कित्येक तासांच्या एकत्रित प्रयत्नातून बिथरलेल्या वळूला खाली उतरविण्यात अखेर यश आले. त्यामुळे पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही सुटकेचा निःश्‍वास घेतला.

जोखीम टळली

वळू तिसऱ्या माळ्यावर चढला खरा, पण त्याला खाली कसे उतरावे हे जमत नव्हते. एकाच ठिकाणी अन्नपाण्यावाचून तब्बल बारा तास राहिल्याने व त्याला खाली उतरविण्यासाठी लोकांनी प्रयत्न केल्याने वळू बिथरला होता. अशा स्थितीत त्याने तिसऱ्या माळ्यावरून उडी घेतली तर कसे होईल, अशी भीती सर्वांनाच वाटत होती. मात्र, मोठ्या हुशारीने वन व पोलिस कर्मचऱ्यांनी वळूला खाली उतरविले आणि एखदाची जोखीम टळली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT