caged parrot now release Otherwise punitive action will be taken on behalf of the forest department 
विदर्भ

पिंजऱ्यातील बंदिस्त पोपट होणार आझाद; अन्यथा वनविभागाच्या वतीने होणार दंडात्मक कारवाई

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : पोपट हा पक्षी राष्ट्रीय संपत्ती असल्याने त्याला पिंजऱ्यात डांबून ठेवता येत नाही. त्यामुळे बंदिस्त पोपटांना पिंजऱ्यातून आझाद करण्यासाठी लवकरच वनविभाग आदेश काढणार आहे. या निर्णयामुळे जंगलातल्या तमाम पोपटांना न्याय मिळणार आहे. शहरात ज्यांच्याकडे पिंजऱ्यात पोपट कैद करून ठेवले आहेत, त्यांचे धाबे दणाणले आहेत. आता पोपट पाळणाऱ्यांना वनविभागाच्या आव्हानानंतर पोपटांना आझाद करावे लागणार आहे; अन्यथा दंडासह कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

पोपट आणि माणूस यांचे जिव्हाळ्याचे संबंध अगदी दंतकथांच्या काळापासूनचे आहेत. थोडक्‍यात पोपट आणि माणूस यांचे जिवाभावाचे नाते आहे. खरे म्हणजे बोलणं ही माणसाची मक्तेदारी; तरीही माणूस जरा जास्तच बोलू लागला की पोपटासारखा बोलतो, अशा शब्दांत त्याचे कौतुक होऊ लागले. तेव्हापासून पोपट बाळगण्याची हौसही वाढू लागली. सध्या जंगली पोपटांना हेवा वाटावा असा तोरा हे पिंजऱ्यातले पोपट मिरवू लागले. आपले पंख कापलेले आहेत, याची खंत त्यांना वाटेनाशी झाली. आता मात्र अशा पोपटांची पंचाईत होणार आहे.

परतवाड्याचे वनखाते एक आदेश जारी करणार आहे. त्यामुळे पिंजऱ्यात कैद असलेले हजारो पोपट पोरके होणार आहेत. मात्र या निर्णयामुळे हजारो बंदिस्त पोपटांना मुक्तसंचार करायला मिळणार आहे. पोपट ही राष्ट्रीय संपत्ती आहे, तो मोकाटच असायला हवा, त्यासाठी परतवाडा येथील वनविभागाने पुढाकार घेत शहरात ज्यांच्याकडे पोपट पिंजऱ्यात बंदिस्त आहेत, अशा पोपटांना आझाद करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी ज्यांच्याकडे पोपट कैद आहे त्यांनी पोपटाला आझाद करण्याचे आवाहन केले आहे. 

सोबतच शहरासह तालुक्‍यात ज्यांच्याकडे पोपट बंदिस्त आहे, अशा कुटुंबाची माहिती देण्याचे आवाहनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, पोपटाची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवणार असल्याचेही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बंदिस्त करून ठेवणे कायद्याने गुन्हा
पोपट आपली राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याला बंदिस्त करून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांनी पोपट पाळले असेल त्यांनी पोपटाला आझाद करावे, अन्यथा पोपट पिंजऱ्यात बंदिस्त दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पोपटाला पकडून त्यांना विकण्यात येत असल्याची माहिती मिळत होती; त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
- प्रदीप भड,
वनपरिक्षेत्राधिकारी, अचलपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT