Cell phones banned teenagers Historic decision yavatmal Gram Panchayat 
विदर्भ

Mobile Phones Banned : बांशी गावात मुलांना मोबाईल बंदी

ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील पहिली ग्रामपंचायत

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतीला मोठे अधिकार मिळाले. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आहे. ग्राम विकासासोबतच समाजस्वास्थ्य सुदृढ राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव करतात. पुसद तालुक्यातील बांशी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी अठरा वर्षांखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे.
पुसद तालुक्यातील सागवानाच्या जंगलाला लागून असलेल्या बांशी गावात ११ नोव्हेंबरला ग्रामसभा पार पडली. त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

त्यामध्ये १८ वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याशिवाय शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना लागू करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
अलीकडे तरुण मोबाईलवेडे झाल्याचे पहावयास मिळते. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आले खरे, मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम दिसून आले. किशोरवयीन मुलांना चांगल्या-वाईट या गोष्टींची अजून समज आलेली नाही. अशा स्थितीत स्मार्टफोनचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊन अनेक मुलांना गेम्स, वाईट साइट पाहण्याचे व्यसन लागलेले असून हे दुष्परिणाम बांशी गावातील नागरिकांना अनुभवास आले. त्यामुळे या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी युवा सरपंच गजानन टाले होते.

गावातील मुलांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. काहीजण पब्जीसारखे गेम खेळतात, तर काही वाईट साइट बघतात. ऑनलाइन शिक्षणापेक्षा हा धिंगाणा विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक आहे. ते टाळण्यासाठी मोबाईलबंदीचा निर्णय घेण्यात आला. अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी समुपदेशनातून दूर करू.
-गजानन टाले सरपंच, बांशी, ता. पुसद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT