Chances of accident in Bhandara district hospital  
विदर्भ

शिशूंच्या मृत्यूनंतर 'त्या' रुग्णालयावर अजूनही मृत्यूचं सावट; रुग्ण जीव धोक्यात घालून घेताहेत उपचार 

अभिजित घोरमारे

भंडारा ः चार दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. त्यानंतर डझनभर मंत्री येथे येऊन गेले. विविध सूचना केल्या, चौकश्या लावल्या. पण हे रुग्णालय आणि येथे दाखल रुग्णांच्या सुरक्षेची अजूनही पूर्ण काळजी घेतली जात नाहीये. रुग्णालयावर मृत्युचे आणखी एक वादळ घोंघावत आहे. त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. हे वादळ म्हणजे मधमाश्यांचा भला मोठा पोळ. 

या एका पोळामध्ये हजारो मधमाश्या आहेत. नशीब, की हा पोळ अजून फुटला नाही. पोळ फुटला तर सर्वप्रथम या वॉर्डातील रुग्णांच्या जिवाला धोका आहे. त्यानंतर इतर लोकांवरही मधमाश्यांचा हल्ला होऊन पुन्हा ९ जानेवारीसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक आठच्या खिडकीजवळ भलं मोठं मधमाश्यांचा पोळं आहे. या पोळातील मधमाश्या वॉर्डातसुद्धा येतात. रुग्णांच्या काही नातेवाइकांना या माश्‍या चावल्यादेखील आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी याबाबत तक्रारीदेखील केल्या. पण प्रशासनाने त्यावर खबरदारी म्हणून कोणतीही उपाययोजना केली नाही. 

रुग्णालयातील जळीतकांडानंतर राज्याच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी येथे भेटी दिल्या. पाहणी केली, आढावा घेतला, सूचना केल्या, चौकश्या लावल्या पण जिल्हा, राज्यच नव्हे तर देशाला हादरवून सोडणारी घटना घडल्यानंतरही हे रुग्णालय आता तरी लोकांच्या जिवासाठी सुरक्षित आहे का, याबाबत कुणीही विचार केलेला दिसत नाही. ९ जानेवारीसारखी दुर्घटना पुन्हा घडल्यास जबाबदार कुणाला धरायचे, याचे उत्तर आज तरी कुणाजवळ नाही. जीवघेण्या मधमाश्यांचा पोळ आहे, हे रुग्णांच्या नातेवाइकांनी लक्षात आणून देताच तो पोळ तेथून सुरक्षितपणे काढणे गरजेचे होते. पण प्रशासनाने काहीही केले नाही. 

आग्या मोहोळ सर्वाधिक धोकादायक 

आग्या मोहोळ म्हटले की भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते. कारण एका पोळामध्ये हजारो माश्‍या असतात. पोळ फुटल्यानंतर त्या दिसेल त्यावर हल्ला करत सुटतात. या मधमाश्यांच्या वाचणे म्हणजे पुनर्जन्मच, असे बोलले जाते. पोळ फुटल्यावर पळायचा प्रयत्न केल्यावरही दोन-दोन किलोमीटरपर्यंत त्या पाठलाग करतात, असे रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाइकाने सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT