Chandrapur News esakal
विदर्भ

Chandrapur News: अंत्ययात्रेला आलेल्या ५० जणांवर मधमाशांचा हल्ला; ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

सिंदेवाही येथील घटना; ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल

रुपेश नामदास

सिंदेवाही: मृतदेह सरणावर ठेवत असतानाच मधमाशांनी हल्ला केला. यात स्माशानात जमलेले वीस ते पंचेवीस जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. ६) येथे घडली. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.यात जवळपास ५० नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.

येथील महाकाली नगरी परिसरात राहणारे राजू मार्तंडवार हे कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.शुक्रवारी त्यांचे निधन झाले.

अंत्यविधि शनिवारी होता. त्यामुळे त्यांचे सर्व नातेवाईक, परिसरातील नागरिक जमले होते. प्रेतयात्रा दुपारच्या वेळेस स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारकरिता नेण्यात आली. स्मशानभूमीत सरण रचले. त्यानंतर विधी सुरू झाला.

प्रेताला अग्नी द्यायची बाकी असताना मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जमलेले नातेवाईक, नागरिकांची धावपळ सुरू झाली. काही नातेवाईकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने ते जखमी झालेत.

मधमाशांचे काटे अंगाला ,मांडीला ,हाताला , मानेला चावा घेऊन रुतलेले होते. मधमाशांनी भरपूर जणांना चावा घेतला. त्यामुळे सरनावरचे रचलेले प्रेत तसेच ठेवलेले होते. सर्वांनी मिळेल तिथे आसरा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्याना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.

ग्रामीण रुग्मालयात नगराध्यक्ष कावळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. या हल्ल्यात चंदू श्रीकुंडवार, प्रदीप अटकापूरवार हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चार वाजता करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: आज मतदान! प्रत्येक क्षणाची अपडेट वाचा एका क्लिकवर

Panchang 20 November: आजच्या दिवशी विष्णुंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा

केंद्रांवरील हालचालींवर पोलिसांच्या ड्रोन अन्‌ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष! सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 11000 पोलिसांचा बंदोबस्त, चहा-नाष्टा, जेवण जागेवरच

आजचे राशिभविष्य - 20 नोव्हेंबर 2024

घरबसल्या शोधा मतदार यादीत तुमचे नाव! नाव शोधण्यासाठी ‘हे’ ३ पर्याय; आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ; मतदान कार्ड नसेल तरी करता येईल मतदान, वाचा...

SCROLL FOR NEXT