Chandrapur MP Pratibha Dhanorkar  esakal
विदर्भ

Pratibha Dhanorkar: निवडून येताच प्रतिभा धानोरकरांच्या भावाचा पराक्रम! अधिकाऱ्यांना शिवीगाळ अन् मारहाणीचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Chandrapur MP Pratibha Dhanorkar : अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता-करता शिवीगाळ केली. यावेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना थापड लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला.

Sandip Kapde

काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. मारहाण केल्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. शिवीगाळ करण्यामध्ये खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे हे आघाडीवर होते. निवडून येताच खासदाराच्या भावाने पराक्रम केल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं?

साम टिव्हीच्या वृत्तानुसार, या घटनेचा व्हिडिओ आता समोर आल्याने खासदार धानोरकर यांच्या प्रतिमेला धक्का पोहचला. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे. या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. सोबतच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना घेवून खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त होते. (Chandrapur Latest News)

अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता-करता शिवीगाळ केली आणि त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यांना थापड लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांना सर्वांनी शिवीगाळ करणे सुरू केले.

उपस्थित पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला फार यश आले नाही. अधिकाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची, मागण्या ठेवण्याची एक पद्धत असते, शिष्टाचार असतो, पण यावेळी तो पाळण्यात आला नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

खुद्द खासदारांच्या सख्ख्या भावानेच शिवीगाळ करायला सुरुवात केल्याने निकाल लागताच मुजोरी आल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, यासंदर्भात कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी, यावर बोलण्यास नकार दिला. असे काही घडले नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, घटनेनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली असून वारंवार कंपनीला निवेदने देऊनही समस्या मार्गी लागल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन करावे लागले. यापुढे असेच राहिले तर काम बंद केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT