cm eknath shinde  esakal
विदर्भ

CM Eknath Shinde: 'मीही सर्वसामान्य मराठा, मला पाण्यात का पाहता?'; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

कार्तिक पुजारी

बुलढाणा- शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा येथे आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केलं. शुक्रवारची घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या काळातच मराठा समाजाचं आरक्षण गेले. जालन्यामध्ये दगडफेक कोणी केली हे पाहावं लागेल , असं ते म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? लाखा-लाखांचे मोर्चे निघाले. 58 मूक मोर्चे निघाले होते. लोक याला विसरणार नाहीत. पण, आता राजकारण सुरु आहे. मराठा समाज संयमी आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं समाज कधीही करणार नाही. त्यामुळे दगडफेक कोणी केली हे पाहावं लागले. कोणी नेते, समाजकंटक जातीय सलोख बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत का याची माहिती येत आहे, असं शिंदे म्हणाले.

काही लोकं आंदोलनस्थळी येऊन गेले. पण, लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री येऊन गेले. पण, २०१७ मध्ये आमच्याच सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. पण, पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मराठ्यांचं आरक्षण रद्द झालं, असं शिंदे म्हणाले.

मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. गरीब शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. मीही सर्वसामान्य एक मराठा आहे. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं नसतं. सरकार पडेल म्हणून नुसती चर्चा होते. आता अजित पवार देखील आमच्यासोबत आले. मुख्यमंत्री बदलणार म्हणून आता ओरड सुरु आहे. एका शेतकऱ्याच्या पुत्रामागे तुम्ही का लागला आहात? असा सवाल त्यांनी केला.

मला का तुम्ही पाण्यात पाहताय, मी काम करतो म्हणून. सर्वसामान्यांमध्ये मिसळतो म्हणून, ईरशाळवाडीमध्ये मी पीडितांना भेटायला गेलो हा माझा गुन्हा आहे का? महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी मदतीला गेलो, शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतो हा माझा गुन्हा आहे का? मी धनदांडगा नाही म्हणून, तोंडात सोन्याचा चमचा नाही म्हणून की माझे बापजादे मंत्री-आमदार नाहीत म्हणून. एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला म्हणून मला पाडण्याचा प्रयत्न होत आहे. पण, जोपर्यंत ही जनता माझ्यासोबत आहेत,तोपर्यंत माझे काहीही होणार नाही, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्येत बरी नसल्याने कार्यक्रमाला येणे टाळले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नियोजित दौऱ्यावर असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर म्हणून ते नाराज आहेत अशी पत्रकारांनी बातमी लावू नये, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT