Congress wants Tirora Assembly constituency seat to contest Officers and activists in the meeting at Chichgaon sakal
विदर्भ

तिरोडा विधानसभेची उमेदवारी काॅंग्रेसलाच हवी; चिचगाव येथील सभेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर

महाविकास आघाडीच्या घटक दलातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात जिंकून आला नाही.

सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव : तालुक्यातील चिचगाव येथे मंगळवारी (ता. १) जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या कार्यकर्त्यांची सभा झाली. या सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने तिरोडा-गोरेगाव विधानसभेची उमेदवारी काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, असा सूर आवळला.

महाविकास आघाडीच्या घटक दलातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात जिंकून आला नाही. मतदारांनी २५ वर्षांपासून काँग्रेसचा आमदार पाहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार नको तो फक्त काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी मनधरणी वरिष्ठांकडे केली गेली आहे.

सभेला पी. जी. कटरे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, अॅड. टी. बी. कटरे, जितेंद्र कटरे, जगदीश येरोला, आरती चवारे, ओमप्रकाश कटरे, अशोक शेंडे, नामदेव नाईक, राहुल कटरे, गोपाल ठाकरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दावेदारी करीत असून, एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत. काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते मीच खरा दावेदार म्हणून दावा करीत आहेत. त्यामुळे पक्ष कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार की, दुसरा पक्ष बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT