Yavatmal Healthcare Recruitment  sakal
विदर्भ

Healthcare : नऊ हजार आरोग्य सेविकांच्या पदभरतीत घोळ,सहाच हजार पास; त्यातूनही उच्च शैक्षणिक अहर्तेमुळे अनेकांना वगळणार

Yavatmal Healthcare Recruitment : आरोग्य सेविकांच्या ९ हजार पदांच्या भरतीत तांत्रिक घोळामुळे फक्त ६ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले. उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले असून, हजारो पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : वर्षानुवर्षे रेंगाळलेली जिल्हा परिषद आरोग्य सेविकांची पदभरती परीक्षा कशीबशी घेण्यात आली. मात्र, ९ हजार पदांसाठी झालेल्या परीक्षेत ५५ हजार उमेदवार सहभागी झाले अन् त्यातून फक्त सहाच हजार उत्तीर्ण झाले.

त्यातूनही उच्च शैक्षणिक पात्रताधारक असल्याचे सांगून अनेकांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे परीक्षेनंतरही आरोग्य सेविकांची जवळपास चार हजार पदे रिक्तच राहणार आहेत.आरोग्य सेविकांच्या (एएनएम) ८ हजार ९५६ पदांसाठी शासनाने आयबीपीएस कंपनीमार्फत जुलैमध्ये परीक्षा घेतली.

परंतु, परीक्षेच्या जाहिरातीत ‘आरोग्य सेविका’ या शब्दासोबतच ‘आरोग्य परिचारिका’ असाही शब्दप्रयोग करण्यात आला. त्यामुळे उच्च शैक्षणिक अर्हता (जीएनएम व बीएस्सी नर्सिंग) असलेल्या उमेदवारांनीही परीक्षाही दिली. त्यांना छाननीमध्ये कमी केले नाही. परंतु, आता निकाल लागल्यानंतर या उमेदवारांना आरोग्य सेविका पदासाठी जिल्हा परिषदांनी अपात्र ठरविले आहे.

नऊ हजार आरोग्य सेविकांच्या पदभरतीत घोळ

दुसरे म्हणजे, परीक्षेची काठिण्यपातळी अधिक असल्याने २०० पैकी किमान ९० (४५ टक्के) गुण मिळविण्याचा निकष ५५ हजारांतून फक्त सहा हजार उमेदवारच पूर्ण करू शकले.

आता या सहा हजारांतूनही उच्च शैक्षणिक अहर्ता असलेल्या उमेदवारांना भरतीतून वगळले जात आहे. त्यामुळे उमेदवारांत नाराजी आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य संस्था आणखी काही वर्षे आरोग्य सेविकांच्या प्रतीक्षेतच राहण्याची शक्यता आहे.

हे आहेत आक्षेप

• जिल्हा परिषदांनी परीक्षेपूर्वी अर्जांची छाननी का केली नाही?

• आता निकालानंतर उच्च अर्हतेच्या उमेदवारांना का वगळता?

• परीक्षेनंतर ‘अ‍ॅन्सर की’, सर्व परीक्षार्थ्यांचे गुण जाहीर केले नाही.

• अधिकाधिक अर्ज येऊन मोठे परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठीच जाहिरातीत अहर्तेबाबत संभ्रम ठेवला.

• परीक्षेची काठिण्य पातळी अधिक असल्याने ‘सहायक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम’ पूर्ण केलेल्या आरोग्य सेविकाही अनुत्तीर्ण झाल्या.

• आरोग्य अभियानात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून १० वर्षांपासून काम करीत असलेल्या उमेदवारही अनुत्तीर्ण झाल्या.

• विशेष म्हणजे, ‘सहायक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम’ शिकविणाऱ्या महिलाही अनुत्तीर्ण झाल्या.

पास झाल्यावर ठरवले अपात्र

यवतमाळमध्ये ३१५ पदांसाठी परीक्षा झाली. यात १०३ जणी पास झाल्यावर त्यातील ३६ महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे.अकोल्यात १२२ पदांसाठी परीक्षा झाली. यात ६७ जणी पास झाल्यावर त्यातील २२ जणींना अपात्र ठरविण्यात आले. नंदुरबारमध्ये २८४ पदांसाठी परीक्षा झाली. यात २१ उमेदवार उत्तीर्ण झाल्या.मात्र सहा जणींना अपात्र करून १५ जणींनाच पात्र ठरविले आहे. अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षेनंतर अनेक पात्र उमेदवारांना उच्च शैक्षणिक अहर्तेमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे.

आरोग्य सेविका परीक्षेच्या जाहिरातीत जाणीवपूर्वक घोळ करण्यात आला.या परीक्षेबाबत आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुख्य सचिवांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. परीक्षेतील तांत्रिक घोळामुळे रिक्त पदांएवढे उमेदवार मिळाले नाही. आता आरोग्य अभियानातील समायोजनाला प्राधान्य द्यावे. उच्च शैक्षणिक अर्हताधारक, तसेच ३५ टक्के गुण धारक उमेदवारांतून पदे भरावी.

- अशोक जयसिंगपुरे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT