अकोला : जगभरात कोरोनाची दहशत पाठ सोडत नाही. अजूनही या विषाणूची लस तयार न झाल्याने परिस्थिती पुर्ववत होणार केव्हा असा प्रश्नच आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतातून चीनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे पुढे आले आहे.
देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढत्या शुल्कामुळे ‘एमबीबीएस’ करण्यासाठी भारतीय विद्यार्थी चीनला जाण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांची संख्या 15 ते 35 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या वर्षी तब्बल आठ हजार भारतीय विद्यार्थ्यांनी चीनमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला आहे. कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश, महाविद्यालयाच्या शुल्काव्यतिरिक्त ‘डोनेशन’ किंवा ‘कॅपिटेशन फी’ भरावी न लागणे, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि मुख्य म्हणजे अठरा ते तेवीस लाखांत सुमारे पाच ते सहा वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पार पडणे, या गोष्टींमुळे डॉक्टर होऊ इच्छिणारे विद्यार्थी चीनकडे देशातील खासगी महाविद्यालयांना पर्याय म्हणून पाहू लागले आहेत.
कोरोनाची भीती चीनमध्ये तुर्तास कायम
चीनमधील वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय भारतीय विद्यार्थ्यांसाठी 2004 पासून खुला झाला आहे. तेव्हापासून भारतातील विविध संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चीनला जातात. मात्र, यावर्षी भारतातून सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात जाणाऱ्या या ॲडमीशला फटका बसण्याचे संकेत आहे. कारण कोरोनाची भीती चीनमध्ये तुर्तास कायम आहे. अजूनही प्रभावी लस यावर शोधण्यात न आलेल्या परिस्थिती आटोक्यात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे परिस्थिती पुर्ववत होण्यावरच ही स्थिती अवलंबून असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातल्या 400 विद्यार्थ्यांना फटका
चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधीक आहे. कोरोनाच्या भीतीने ते मायदेशी परतलेले आहेत. तेथील परिस्थिती अजूनही पुर्ववत न झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राला फटका बसण्याचे संकेत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 400 विद्यार्थी असल्याचे कळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.