corruption 
विदर्भ

ऐकावे ते नवलच! खुद्द गावच्या उपसरपंचावरच भ्रष्ट्राचाराचे आरोप

प्रमोद काकडे

राजुरा (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील नोकरी हे गाव पेसाअंतर्गत येते. या गावातील शौचालय, सिमेंट कॉंक्रिट रस्ता, सगाशक्ती केंद्राचे बांधकाम करण्यात आले. या सर्व कामांचे कंत्राट गावातील उपसरपंचांनी घेतले. मात्र, या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे संबंधित उपसरपंचांवर ऍट्रॉसिटी ऍक्‍टनुसार कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नोकरी हे आदिवासी बहुल गाव डोंगराच्या कुशीत, अमलनाला प्रकल्पाजवळ वसले आहे. २५० कुटुंबांची वस्ती असलेल्या गावात ९ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. पेसाअंतर्गत या गावचे सरपंचपद लता उईके, तर उपसरपंचपद वामन तुराणकर यांच्याकडे आहे. गावाच्या विकासासाठी पेसा योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. परंतु, आदिवासी बहुल, अशिक्षित नागरिक असल्याने येथील उपसरपंच हे पदाचा गैरवापर करीत दबावतंत्र वापरून गावातील कामांचे कंत्राट स्वत:च घेत आहेत. या कामात त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोळापेक्षा अधिक कुटुंबांसाठी शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामाचे कंत्राट उपसरपंच तुराणकर यांनी घेतले. परंतु, शौचालयांचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहेत. अनेक कामे अर्धवट स्थितीत असतानाही निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले. तसेच तीन लाख रुपये खर्चून पन्नास मीटर सिमेंट कॉंक्रिट रस्ता बांधण्यात आला. परंतु, वर्षभरातच रस्ता उखडला आहे. आदिवासींची श्रद्धा असलेले सगा शक्ती केंद्राच्या कामातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

यासंबंधी विचारणा करणाऱ्यांचीच तुराणकर दमदाटी करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या उपसरपंचांवर ऍट्रॉसिटी ऍक्‍टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कामांचा दर्जा निकृष्ट
उपसरपंच स्वत: गावातील बांधकामाचे कंत्राट घेत आहेत. त्यांनी केलेल्या अनेक कामांचा दर्जा निकृष्ट असून, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे यासर्व प्रकरणाची प्रशासनाने चौकशी करावी.
 संदीप परचाके, गावकरी

आरोप वैयक्तिक आकसापोटी
गावातील कोणत्याही कामाचे कंत्राट घेतलेले नाही. तीन लाखाच्या आतील कामे ग्रामपंचायत करीत असते. कोरोनामुळे शौचालयाच्या कामाला विलंबत झाला आहे. तक्रारकर्त्यांचे आरोप वैयक्तिक आकसापोटी आहेत.
 वामन तुराणकर, उपसरपंच नोकरी

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT